दि.25 आक्टों. भोकर ते नांदेड जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर चिदगिरी फाट्याजवळ भोकर कडून नांदेड कडे जाणारी कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे अपघात होऊन शाळकरी विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे.
सध्या खेडोपाड्यातील जिल्हा परीषद प्राथमिक शाळांचे शिक्षक हे आपली मुले नांदेड येथे शिक्षणासाठी ठेऊन स्वत: देखील नांदेडहुनच 70-80 कि.मी. अंतरावरील आपल्या शाळेपर्यंत चारचाकी वाहनातून ये-जा करत कर्तव्य बजावतांना दिसत आहेत. शिक्षकांमध्ये जणू तशी स्पर्धाच चालू असल्याचे चित्र सर्वत्रच पाहायला दिसत आहे. विषेशतः यामध्ये काही शिक्षक परफेक्ट चालक नाहीत. त्यामुळे अशा महामार्गावर नवशीक्या चालकाचा ताबा सुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. चितगीरी फाटा येथील अपघातग्रस्त कार ही शिक्षकांचीच असल्याची स्थानिक नागरीकांमध्ये चर्चा आहे.
सौहार्द अशोक पांचाळ वय१६ वर्ष भोसी येथील शाळा सुटल्यानंतर शाळेतून घरी परत जात होता. पाठीमागून येणाऱ्या कार क्र. MH०८ Z ९४२० या कार ने या विद्यार्थ्याच्या सायकल ला जोराची धडक दिली. त्यामुळे सौहार्द पांचाळ हा दहा ते पंधरा फूट उंच उडून परत जमिनीवर आपटला व या अपघातात तो गंभीर जखमी झाला. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडीने तीन-चार पलट्या खाल्या. यावेळी गाडी मध्वे असणाऱ्या चारही व्यकती ंनी शाळकरी विद्यार्थ्याला न पाहता तेथून पलायन केले तेथील सदरील अपघाताची माहिती प्रत्यक्ष दर्शनी भोसी येथील प्रदीप कल्याणकर यांनी बीड जमदार राजेश्वर गुंडेवाड व ए एसआय दिलीप जाधव यांना अपघाताची माहिती दिली असता भोकर पोलीस स्टेशनचे बिट जमादार राजेश्वर गुंडेवाड यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून भोसी येथील शासकीय रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेत पुढील उपचारासाठी नांदेड येथील भगवती हॉस्पिटल येथे पाठविले आहे. व मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे

Discussion about this post