दूध भेसळ प्रतिबंधक समितीची धडक कारवाई; राहुरी, काेपरगाव, कर्जत, जामखेडमध्ये भेसळयुक्त दूध नष्ट.

दिवटे प्रतिनिधी :-
शेवगाव : दूध भेसळ प्रतिबंधक समितीतर्फे जिल्ह्यातील विविध ११ दूध संकलन केंद्रावर नुकतीच धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत बहुतांंश ठिकाणचे भेसळयुक्त दूध नष्ट करण्यात आले असून दूध भेसळखाेरांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
या ठिकाणी कारवाई करण्यात आली.
दूध भेसळ प्रतिबंधक समितीतर्फे राहुरी, कोपरगाव, कर्जत आणि जामखेड तालुक्यातील दुधाचे नमुने घेण्यात आले. यात राहुरी तालुक्यातील शिलेगाव येथील,
जगदंबा दूध संकलन केंद्र.
जगदंबा माता दूध संकलन केंद्र.
शिलेगावातील पतंजली दूध संकलन केंद्र.
कोपरगावातील साई अमृत दूध संकलन केंद्र.
धोंडेवाडी येथील नारायणगिरी दूध संकलन केंद्र.
आदी ठिकाणी कारवाई करण्यात आली. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बडे, जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी गिरीश सोनोने यांनी केली. या कारवाईत एकूण नऊ ते दहा हजार लिटर भेसळयुक्त दूध नष्ट करण्यात आले आहे.
Discussion about this post