सोलापूर – तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग ते वडगाव काटी या गावास जाणारा रस्ता खराब असून ग्रामस्थांना ये जा करणे अडचणीचे होत होते .
हा रस्ता व्हावा अशी गावातील नागरिकांची मागणी होती. खराब रस्ता व नागरिकांची मागणी लक्षात घेता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सदर रस्ता सिमेंट काँक्रिट मध्ये करण्यात येणार आहे.
या रस्त्यासाठी 9 कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे . त्यामुळे वडगाव काटी या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला आहे अशी माहिती आमदार राणा जगजीतसिंह पाटिल यांनी दिली आहे .
Discussion about this post