शिरोळ तालुका प्रतिनिधी
शिरोळ विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून गणपतराव पाटील यांचे नाव जाहीर झाल्याची माहिती आत्ताच हाती आली असून
काँग्रेस पक्षाकडून गणपतराव पाटील हे निवडणूक लढवणार आहेत. 26 ऑक्टोंबर रोजी गणपतराव पाटील यांच्यानावार शिक्का मोर्तेाब झाला, असुन मंगळवारी 29 ऑक्टोंबर धनत्रयोदशीचा मुहुर्त साधुन उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
आमदार सतेज उर्फ बंटी पाटील व कॉग्रेस पक्षश्रेष्टीने राष्ट्रीय नेते खासदार शरद पवार यांच्याकडे, राधानगरी वांद्रापुर्व, वाद्रा पश्चिम आणि उत्तर कोल्हापुर राधानगरी, या मतदार संघाचा आढावा घेत. शिरोळमध्ये आम्ही जिंकुन येतो. आणि हि उमेदवारी पाहिजे असा अग्रह धरला आणि अखेर शुक्रवारी इंडीया आघाडीच गणतराव पाटील यांच्या नावावर शिक्का मोर्तोब झाला.
शनिवारी गणपतराव पाटील यांच्या नावाची घोषणा, हात या चिन्हासाठी कॉग्रेस या पक्षासाठी इंडीया आघाडीची झाली.
गणपतराव पाटील यांनी शिरोळ तालुक्यात अंदाजे 20 ते 22 हजार एकर इतके क्षेत्र क्षारपड युक्त झालेल्या जमिनी नापीक झालेल्या होत्या सदर जमिनी सुधारण्यासाठी संबंधित शेतकरी यांना एकत्रित आणून त्यांच्यामध्ये चर्चा घडवून आणून मुख्यत्वे करून तालुक्यातील बुबनाळ ,शेडशाळा ,अर्जुनवाड, आलास, गणेशवाडी, कवठेसार, घालवाड, मजरेवाडी, हेरवाड, कवठे गुलंद व मंगावती या गावातील शेतकऱ्यांची सहकारी संस्था स्थापन केल्या या संस्थांच्या माध्यमातून सुमारे आठ हजार पाचशे एकर क्षेत्रावर सचित्र भूमिगत प्रणालीचा उपयोग करून सदर क्षारपड जमिनी सुधारण्यात यश प्राप्त केले आहे.
गणपतराव पाटील हे जनसंवादाचे लोक विद्यापीठ, कार्याचा अखंड प्रवाह तेवत ठेवणारा कार्य कुशल नेता, शिरोळ तालुक्यात सहकार रुजवणारे, सहकार क्षेत्राच्या विकासाद्वारे ग्रामीण व कृषी विकास साधणारे सहकारातील निर्णयक्षम, माजी आमदार श्री दत्त उद्योग समूहाचे शिल्पकार स्व. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांचे ते चिरंजीव आहे.
Discussion about this post