विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यामध्ये दि १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजलेपासून २० नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये ‘ड्राय डे’ असणार आहे. जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी यांनी तसे आदेश काढले आहेत. तसेच मतमोजणी च्या दिवशीही संपूर्ण दिवस दारू आणि ताडी विक्री ची दुकाने बंद राहणार आहेत. निवडणुका या भय मुक्त खुल्या वातावरणात आणि शांततेत पार पडण्यासाठी मद्यविक्री वर या कालावधीमध्ये बंदी असणार आहे. याबाबत लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ च्या कलम १३५ सी नुसार ड्राय दे जाहीर करण्याबाबत तरतूद असून मतदानाची वेळ संपण्याच्या आधी ४८ तास आधीपासून मतदानाच्या दिवशी रात्री १२ पर्यंत दारू विक्रीवर बंदी असेल त्याचप्रमाणे मतमोजणी च्या दिवशी संपूर्ण दिवस दारू विक्रीवर बंदी असेल या तरतुदीनुसार जिल्ह्यामध्ये सर्व दारू विक्री तसेच ताडी विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जरी करण्यात आले आहेत. या दरम्यान या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध दारूबंदी अधिनियम १९४९ नुसार कडक कारवाई करण्याचे आदेशहि देण्यात आले आहेत.
Discussion about this post