
मोहन पांढरे पत्रकार संघ फूलसावंगी अध्यक्ष
गणेश राठोड
तालुका प्रतिनिधी / उमरखेड
फुलसावंगी येथील पत्रकार बांधवांनी विधानसभेमध्ये योग्य उमेदवाराची निवड करण्याच्या प्रक्रियेत एकजुटीने ठाम भूमिका घेतली आहे. लोकप्रतिनिधींनी पत्रकारांना सन्मानाने वागवले पाहिजे, त्यांच्या मते ऐकून घेतले पाहिजे, आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे पत्रकार संघाचे मत आहे. पत्रकार संघाच्या मते, समाजामध्ये घडणाऱ्या घटनांची अचूक माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रकार अहोरात्र मेहनत घेतात. समाजप्रबोधन आणि अन्यायविरोधी लढ्यात पत्रकारांचं योगदान अनमोल आहे, आणि यासाठी त्यांना योग्य मान्यता मिळणे गरजेचं आहे.
त्यामुळे, आगामी निवडणुकीत अशा उमेदवारालाच पाठिंबा दिला जाईल, जो पत्रकारांच्या कार्याची कदर करेल आणि त्यांच्या हिताची काळजी घेईल, असा ठाम विश्वास फुलसावंगी येथील पत्रकारांनी व्यक्त केला आहे.यावेळी पत्रकार संघाचे सर्व सदस्य गण उपस्थित होते.
Discussion about this post