

आमदार पुत्राने घेतली तुतारी हाथी
मानोरा प्रतिनिधी /विशाल मोरे
मानोरा :- विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असुन सर्वच पक्षा सह अपक्ष उमेदवारांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. महाविकास आघाडीकडुन स्व. आमदार राजेन्द्र पाटनी यांचे चिरंजीव ज्ञायक पाटनी यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाची उमेदवारी जाहीर करण्यात आली असून भाजप कडुन स्व.आमदार प्रकाश डहाके यांच्या पत्नी सईताई डहाके यांना उमेदवारी मीळाली आहे.
वंचीत बहूजन आघाडीकडुन नविन उमेदवार आभिजित राठोड यांना उमेदवारी मीळाली आहे.
बॉक्स …
भाजपा उमेदवाराची होणार अडचण
२०१९ मध्ये स्व आमदार प्रकाश डहाके हे राष्ट्रवादी कॉग्रेस च्या घड्याळ चिन्हावर निवडणुक लढले होते. दुसऱ्या क्रंमाकाचे मतदान घेतले होते, आता त्यांच्या पत्नी भाजप कडून कमळ चिन्हावर निवडणूक लढत आहे.
स्व.आमदार राजेन्द्र पाटनी हे २०१९ मध्ये भाजप कडुन निवडणूक लढले होते व विजयी झाले होते. आता त्यांचा मुलगा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तुतारी या चिन्हावर लढत आहे.
यामुळे उमेदवार स्व. आमदार राजेन्द्र पाटनी यांच्या मुलाला डावलल्याने मोठा फटका बसणार, आहे, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या वतीने ज्ञायक पाटनी उमेदवाराचे नाव ठरले असून घोषित करण्यात येईल. सईताई डहाके यांचा उमेदवारी अर्ज दाखल होईल प्रचाराचा नारळ फुटायच्या आधी सोशल मिडियावर प्रचाराला धूमधडाक्यात सुरुवात देखील केली आहे.
मात्र ऐनवेळी जाहीर होणाऱ्या भाजपच्या उमेदवाराला
निवडूक संदर्भातील सर्वच विषयाला प्राधान्य देण्यात कमी वेळ मिळणार आहे. या मुळे भाजपच भाजपाच्या अधिकृत उमेदवाराच्या पानिपत साठी कारणीभूत ठरणार की ? अशी बिकट स्थिती निर्माण झाली आहे.
घर का भेदी लंका ढाये
कांरजा-मानोरा विधानसभा मतदारसंघात गेल्या अनेक दिवसापासून भाजप अंतर्गत आरोप प्रत्यारोप वादविवाद चव्हाट्यावर आले यामुळे भाजपा मध्ये दोन गट पडले यामुळे उमेदवारी कोणालाही मिळो भाजपाच्याच उमेदवाराला भाजपाच्याच गटबाजीचा धोका निर्माण होणार आहे., त्यामूळे, घर का भेदी (बिभीष) लंका ढाये अशी परिस्थिती या मतदारसंघात भाजपची पहावयास मिळत आहे.
मागील विधानसभा 2019 च्या निवडणुकीत दहा वर्ष सत्ता काबीज ठेवणारे स्व.राजेन्द्र पाटनी यांच्या मुलाला टिकीट मीळेल असे वाटत होते .गेल्या दहा वर्षांपासून यांची उमेदवारी च काय विरोधी पार्टीचा उमेदवार सुद्धा पाटनीच ठरवायचे अशी चर्चा मतदारसंघात आहे.
भाजपने पहिली यादी जाहीर केली या मध्ये ज्ञायक पाटनी यांचे नाव का नाही? असा गंभीर चिंताजनक प्रश्न मतदारसंघात राजकीय पुढाऱ्याआहेच पडला होता. या तुलनेत स्व.आमदार प्रकाशदादा डहाके यांच्या पत्नी सईताई डहाके यांचा भाजपा मध्ये प्रवेश घेवून भाजपा पीछाडीवर असल्याचे चित्र दिसून येत आहे.
बॉक्स …..
माघोवा २०१९
विधानसभा निवडणूक २०१९ मध्ये भाजपचे स्व.आमदार राजेन्द्र पाटनी यांना ७३२२०५ मते मीळाली होती.
राष्ट्रवादी कॉग्रेस चे स्व.आमदार प्रकाश डहाके यांना ५०४८१ मते मिळाली होती .
बहुजन समाज पार्टी चे युसूपसेठ पुजांनी यांना ४१९०७ मते मीळाली होती.
वंचीत बहुजन आघाडी चे डॉ .राम चव्हाण यांना १२१९३ मते मिळाली होती.
Discussion about this post