
डहाणू प्रतिनिधी: दशरथ दळवी
पालघर जिल्ह्यातील कासा येथील अनुजा अवकाश निरीक्षण केंद्र कासा या प्रसिद्ध खगोल विज्ञान केंद्रात .बोईसर येथील श्री विद्या बोईसर या इंग्रजी माध्यमाच्या शाळेची शैक्षणिक सहल शुक्रवार दिनांक २५ ऑक्टोबर रोजी आयोजीत केली होती. सदर सहलीत १५० विद्यार्थी व २० शिक्षकांचा समावेश होता. या सहली दरम्यान
विद्यार्थ्यांनी केंद्रांत खगोलीय माहीतीसह दुर्बिणीतून निरीक्षण करण्याचा आनंद लुटला. या आनंदात शाळेच्या मुख्याध्यापिका व सर्वच शिक्षकांचा समावेश होता. या शैक्षणिक सहलीत चंद्रकांत घाटाळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक खगोलीय प्रश्नांची समाधान कारक उत्तरे मिळाली.
Discussion about this post