
मानोरा बसस्थानक येथिल प्रकार
मानोरा प्रतिनिधी /विशाल मोरे
मानोरा : ऐकीकडे शासन महीलांचा सन्मान म्हणुन लाडकी बहीण योजना राबवत आहे आणी मानोरा येथील बसस्थानक येथिल शौचालयाला कुलुप लावून अपमान होतांना दिसून येते.
मानोरा बसस्थानक येथे शालेय विध्यार्थीनी वृद्ध महीला शौचालयाला कुलूप असल्यामुळे कुंचबना होत आहे.गेल्या एक महीण्यापासुन कुपनलीका बंद आहे पीण्याच्या पाण्याची टाकी पण रीकामी राहते वेळापत्रक पण दर्शनी भागात नाही रविवारी दिवशी बसस्थानक नियंत्रकला सुट्टी राहते तर चौकशी करावि कुठे हा प्रश्न पडतो तरी मानोरा बसस्थानक येथे सुविधेचा अभाव दिसुन येतो.
बॉक्स ….
बसस्थानक येथिल कुपनलीकेची मोटर पंप खराब झाल्यामुळे वरीष्टाकडे पत्रव्यवहार केला आहे नविन मोटर पंपची माघणी केली आहे जुनी मोटर ही वापरणे योग्य नसल्यामुळे पाण्याची व्यवस्था नाही तरी लवकर हा प्रश्न सोडवू..
विजय भोरकडे
बसस्थानक नियंत्रक मानोरा
Discussion about this post