
ग्रामीण भागातील रुग्णांचा प्रश्न ऐरणीवर दोन दोन वैद्यकीय अधिकारी असून सुद्धा उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळ सांड होत असल्याचे दिसून येत आहे.
राळेगांव तालुका प्रतिनिधी- अरविंद कोडापे
२७ ऑक्टोंबर
राळेगाव तालुक्यातील रिधोरा गावालगत असलेल्या वाढोणा बाजार येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन दोन वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती असताना सुद्धा इथे कंत्राटी सी. एच. ओ. यांच्याकडून रुग्णांची तपासणी होत आहे. सविस्तर वृत्त असे राळेगाव तालुका हा आदिवासी मतदारसंघ असून या मतदारसंघांमध्ये रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून शासनाने तालुक्यात बऱ्याच ठिकाणी तालुका आरोग्य कार्यालय अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र
उभारली आहे यात धानोरा, वरध, दहेगाव व वाढोणा बाजार येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. सदर वाढोणा बाजार या आरोग्य केंद्रा अंतर्गत रिधोरा सह अंदाजे १५ ते २० गावे जोडली आहे. परंतु बाकी इतर तीन प्राथमिक आरोग्य केंद्र वगळता वाढोणा बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे नेहमीच कोणत्या नाही कोणत्या कारणाने चर्चेत आलं आहेत तर या प्राथमिक केंद्राबाबत बऱ्याचदा वृत्तपत्रामध्ये बातम्या सुद्धा प्रकाशित झाल्या आहे. सदर शासनाने कोटी रुपये खर्च करून वाढोणा बाजार येथे रुग्णांचा सोयीसाठी भव्य असी इमारत उभारली आहे.
परंतु प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नेहमीच रुग्णांची गैरसोय होताना दिसत आहे. कधी कधी तर रुग्णच स्वतः हाताने मलमपट्टी करताना दिसतात सदर या आरोग्य केंद्रामध्ये मुख्यालय २ वैद्यकीय अधिकारी व १२ कर्मचारी यांची नियुक्ती आहे परंतु कधी कधी तर वैद्यकीय अधिकारी तर सोडाच परंतु कर्मचारी सुद्धा हजर राहत नाही. जर या आरोग्य केंद्राला दोन दोन वैद्यकीय अधिकारी असून सुद्धा ज्या कंत्राटी सी. एच.ओ. कडे कुठल्याही प्रकारची डिग्री नसताना येथे सी. एच. ओ. कडून रुग्णांची तपासणी जर होत असेल तर रुग्णांच्या जीवाशी खेळणे नाहीत का ? जर रुग्णांना चुकीच्या स्टेटमेंट मुळे कमी अधिक झाल्यास याला
जबाबदार कोण ? सदर या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नेहमीच असा प्रकार घडत असून यावर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे जाणून बुजून दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. असे रिधोरासह परिसरातील रुग्णांमध्ये बोलल्या जात आहे. सदर उपचारादरम्यान एखाद्या रुग्णांना कमी अधिक झाल्यास याला जबाबदार जिल्हा आरोग्य अधिकारी राहतील असेही रिधोरासह परिसरातील नागरिकांमध्ये बोलल्या जात आहे. सदर जिल्हा अधिकारी यांनी या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे लक्ष देण्याचे मागणी होत आहे..
Discussion about this post