
मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीने माझे हृदय भारावून गेले. याप्रसंगी महाविकास आघाडीच्या, राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी, कार्यकर्त्यांशी, युवक, महिला, वक्ता, सेवादल, ग्रंथालय सेलच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
“शरद पवार नावाचं वादळ या राज्यावर पुन्हा एकदा घोंगावत आहे. आता मागे हटायचं नाही! गद्दारांनी, बेईमानी करणारांनी या महाराष्ट्राची मौलिक संस्कृती संपवली. त्यांना संपवण्याचे काम आपणा सर्वांना करायचे आहे. आज अर्ज भरतोय, निकालाच्या दिवशी गुलाल उधळू! तो गुलाल तुमच्या प्रगतीचा, तुमच्या चिंतांचा, तुमच्या विकासाच्या अनुशेषाचा असेल, हे जाहीरपणाने सांगू इच्छितो.
वेळोवेळी माझ्या राजकीय जीवनात तुम्ही आपली प्रचंड ताकद पाठीशी उभी केली. आज देखील आपले प्रेम व पाठिंबा मिळाला आहे. यातूनच सहकाराचा विखुरलेला पसारा आपल्याला पुन्हा सांधायचा आहे! त्रासलेला शेतकरी-कष्टकरी, वसमत विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदार पुन्हा एकदा उभा करायचा आहे.
माझा अनुभव पूर्ण पणाला लावीनच, परंतु आपणा सर्वांच्या मार्गदर्शनाखाली, तुमच्या प्रत्येक सूचनेचा आदर करत विकासाचा प्रत्येक निर्णय होईल. ताठ मानेने, स्वाभिमानी कण्याने माझ्या पाठीशी आपण सर्वजण खंबीरपणे उभे आहात, याची मला कल्पना आहे. आपणा सर्वांच्या आशीर्वादाच्या बळावर महाराष्ट्रात चर्चा होईल, असा विक्रमी विजय मिळवू,” असा विश्वास व्यक्त करत भविष्यकाळात वसमत विधानसभा मतदारसंघाचा विकासाचा अनुशेष भरून काढण्याची ग्वाही दिली.
तुमच्या प्रतिसादाने मला नवी ऊर्जा मिळाली! आता लढू आणि जिंकू.. उपस्थित महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे आभार !
Discussion about this post