
मानोरा प्रतिनिधी /विशाल मोरे
मानोरा : पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा दापुरा खुर्दचे माजी लोकनियुक्त सरपंच युवा नेता मधुसूदन राठोड यांनी दि. २८ ऑक्टोंबर रोजी कारंजा – मानोरा विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी याजकडे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.
मागील २५ वर्षांपासून काँग्रेस पक्षात सक्रीय असलेले मधुसूदन राठोड यांनी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
त्यांचा नामांकन अर्ज दाखल झाल्याने मतदार संघात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. गेल्या अनेक वर्षापासून स्थानिक मतदार संघात गोरगरिबांच्या सोबत राहून त्यांच्या अनेक समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेऊन प्रयत्न केला आहे. त्यामुळे मतदार संघातील कारंजा व मानोरा तालुक्यातील मतदार राजा माझ्या सोबत असल्याची प्रतिक्रिया यावेळी अपक्ष उमेदवार राठोड यांनी प्रस्तुत प्रतिनिधीजवळ व्यक्त केली.
Discussion about this post