
घनसावंगी मतदारसंघातील राजकीय मैदान गाजविण्यासाठी पॅंथर नावाने परिचित असलेले शाम कचरू साळवे यांनी घनसावंगी मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. जनसामान्यांच्या प्रश्नाची सोडू नुक करण्यासाठी 24 तास उपलब्ध राहणार दलित कुटुंबातील युवा तरूण चेहरा म्हणून अंबड आणि घनसावंगी मतदारसंघात त्यांची ओळख आहे.
सर्वच समाजातील सर्व जाती धर्मामध्ये त्यांचा चांगला मोठा मित्रपरिवार आहे. श्याम साळवे यांच्या रूपाने घनसांगी मतदारसंघात चांगल्या प्रकारे जनते समोर निवडून देणे योग्य उमेदवार निर्माण झाला आहे. साळवे यांनी दिनांक 28/10/2024 रोजी घनसावंगी विधानसभा निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज सर्व महापुरूषांना विनम्र अभिवादन करून दाखल केला. या पसंगी उपस्थित मातंग समाजाचे जेष्ठ नेते कचरूजी साळवे तसेच अंबादास जाधव मित्र परिवारातील अर्जुन भागवत बाबुराव कापसे अमोल नरोटे मनोज वाघ,आबासाहेब भाले समाजातील तरूण कार्यकर्ते संतोष शेळके ,अनिल साळवे आदी कार्यकर्ते व समाज बांधवांच्या उपस्थित अर्ज दाखल केला..
Discussion about this post