निलंगा/प्रतिनिधी: निलंगेकर कुटुंब हे एक संस्कारक्षम कुटुंब असून आ.संभाजीराव पाटील निलंगेकर हे एक सुसंस्कृत राजकीय नेतृत्व आहे.यामुळेच त्यांच्या परिवाराशी माझे अनेक वर्षांचे ऋणानुबंध जुळलेले आहेत. निलंग्यातील जनतेने या लाडक्या नेतृत्वाला प्रचंड मताधिक्याने विजयी करावे,असे आवाहन प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांनी केले.
आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्यासाठी अवधूत गुप्ते यांनी एक गीत रेकॉर्ड केले आहे. त्यानंतर मतदारसंघातील जनतेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधताना गुप्ते यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अवधूत गुप्ते म्हणाले की, विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने मी राज्यातील जवळपास सर्व मतदार संघामध्ये फिरलो आहे. परंतु केवळ कांही ठिकाणीच माणसाचे ऋणानुबंध जुळतात. तेथील मातीशी नाळ जोडली जाते.निलंग्याची माती याच प्रकारची आहे. म्हणूनच अनेक वर्षांपासून मी निलंगाशी जोडला गेलो आहे.
गुप्ते यांनी सांगितले की,२०२१ यावर्षी मी कार्यक्रमासाठी निलंगा शहरात आलो होतो. एकदा आलो आणि निलंग्याचा होऊन गेलो. आ.संभाजीराव पाटील निलंगेकर व त्यांच्या परिवाराने मला आपलेसे केले,माझा वाढदिवस त्यांनी साजरा केला.या नेतृत्वाला पाठबळ देण्याची गरज आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येकाने मतदान करावे.आपले लाडके नेतृत्व,आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांना प्रचंड मताधिक्याने विजय करावे.आ.संभाजीराव पाटील हे माणूस म्हणून एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व असल्याने त्यांना पुन्हा एकदा विजयी करून विधानसभेत पाठवावे, असे आवाहनही गुप्ते यांनी आपल्या संदेशात केले आहे
Discussion about this post