आजरा – तालुका प्रतिनिधी,
आज चंदगड विधानसभा उमेदवारी अर्ज भरताना मा. खासदार श्री. शाहू छत्रपती महाराज, सतेज उर्फ बंटी पाटील माजी पालक मंत्री, संभाजीराव देसाई – शिरोलीकर आणि शिवप्रसाद तेली, आजरा माजी पंचायत समिती, सभापती सौ. रचना होलम यांची महत्वाची व प्रेरणादायी उपस्थिती लाभली, त्यामुळे महाविकास आघाडीचा जिवंत अनुभव असून त्यामुळे बदलाचा आमविश्वास अधिक वाढला, वाढता जनसंपर्क आणि आज अर्ज भरतेवेळी ही वेळ म्हणजे माझे विजयाचे प्रतिक होते परिवर्तनाचे पाहूल आहे.
चंदगडच्या मातीत बांबानी आपले विचार, माणूसकी, आणि जे पेरले तेच आज सत्य ठरणार, गोरगरिब सेवा हेच ध्येय ठेवून आणि आजरा – चंदगड मतदार संघातील विकासाची मोट घेवून जाणार.
आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचे विचार, प्रेरणा आणि ध्येय घेवून आज अर्ज दाखल केला असून माझे सहकारी, कार्यकर्ते, आणि माझेवर विश्वास असणारी जनता हेच माझे दैवत मानून उद्याचा विजय मानून पुढे जाणार आणि जनता त्याचे फळ नक्कीच मला देणार
Discussion about this post