सांगली येथील मार्केट यार्ड मध्ये झालेल्या बेदाणा सौद्यामध्येजत तालुक्यातील उमदी मधील शेतकऱ्याच्या बेदाण्याने चांगलाच ‘भाव’ खाल्ला हिरव्या बेदाण्यास ४०० रु प्रति किलो इतका भाव मिळाला रमेश तळी असे या शेतकऱ्याचे नाव असून हा दर यंदाच्या हंगामा मधील सर्वोच्य दर मानला गेला. मात्र जाणकार शेतकऱ्यांच्या मते यंदा बेदाण्याचे उत्पादन हे मागील वर्षापेक्षा ३० ते ४० टक्क्यांनी घटले आहे. हि चिंतेची बाब आहे. यंदा मुस्लिम धर्मियांच्या रमजान सणामुळे बाजारामधील हिरव्या बेदाण्याला मागणी जास्त असल्याचे समजते. मागील वर्षात बेदाण्याचे उत्पादन जास्त झाल्याने दर कोसळले होते यंदा द्रक्षाचे उत्पादन घटल्याचे चित्र आहे. परिणामी द्राक्षाला दर चांगला आहे. सांगली येथील बाजारपेठ संपर्ण भारतामधे प्रसिद्ध आहे रमजान महिन्यामुळे देशभरातील व्यापारी बेदाणा खरेदी साठी मार्केट यार्ड येथे येत असतात. चांगल्या दर्जाच्या बेदाण्यास प्रति किलो २०० ते ४०० रु दर मिळतोय तर तर सर्वसामान्य बेदाण्यास १५० ते ३०० रु दर मिळाला आहे. यंदा बेदाण्याचे उत्पादनच कमी असल्याने यापुढे यंदाच्या हंगामामध्ये बेदाण्याच्या दरामध्ये तेजी राहणार असल्याचे बेदाणा व्यावसायिकांचे मत आहे.
Discussion about this post