उदगीर प्रतिनिधी : सन 2021-22 या आर्थीक वर्षात कृषी उत्पन्न बाजार समितीने विविध कामासाठी करोडो रुपये खर्च केलेले आहेत.परंतू कांही व्यवहारा बाबत 12 (1) ची पुर्व परवानगी घेणे आवश्यक असताना तशी परवानगी न घेताच रक्कमा खर्च केलेल्या आहेत.व असा खर्च केलेल्या रक्कमांची बिले बाजार समितीमध्ये अदयाप सादर केलेली नसताना अश्याबिलांच्या रक्कमा आदा केलेले आहेत.i) दि. 15.04.2021 रोजी किर्द पा क्र 07 वर लाईट खर्च रू746767/- उमा उदयोग,लातूर यांना धनादेशाद्वारे रक्कम अदा केलेली आहे.
परंतू सदरची रक्कम कोणत्या कामासाठी किंवा कोणत्या वस्तू खरेदीसाठी देण्यात आली.या बाबत दप्तरी कसलेही नोंद दिसून आली नाही,तसेच मागणी पत्र किंवा कोटेशन घेतल्याचे दिसून येत नाही किंवा याबाबत वर्तमान पत्रात जाहीरात दिल्याचे दिसून येत नाही तसेच 12(1) ची मंजूरी घेतली नाही.त्यामुळे केलेल्या खर्चाची खातरजमा होऊ शकत नाही. संबधीत व्यापा-याने खर्चाची बिले सादर केलेली नसताना कृषी उत्पन्न बाजार समीतीने संबधीत व्यापारी,तत्कालीन सभापती व तत्कालीन सचिव सर्वानी मिळून संगनमत करून त्या बिलाची रक्कम अदा केली आहे,त्यामुळे या बाबीस तत्कालींन सभापती व सचिवास जबाबदार का धरण्यात येवू नयेत ?
ii) दि. 18.11.2021 रोजी किर्द पा क्र 100 वर लाईट खर्च रु 749150.13/- उमा उदयोग,लातूर यांना धनादेशाद्वारे रक्कम अदा केलेली आहे.परंतू सदरची रक्कम कोणत्या कामासाठी किंवा कोणत्या वस्तू खरेदीसाठी देण्यात आली या बाबत दप्तरी कसलेही नोंद दिसून आली नाही, तसेच मागणी पत्र किंवा कोटेशन घेतल्याचे दिसून येत नाही किंवा याबाबत वर्तमान पत्रात जाहीरात दिल्याचे दिसून येत नाही तसेच 12 (1) ची मंजूरी घेतली नाही.त्यामुळे केलेल्या खर्चाची खातरजमा होऊ शकत नाही.संबधीत व्यापा-याने खर्चाची बिले सादर केलेली संबधीत व्यापारी, तत्कालीन सभापती व तत्कालीन सचिव सर्वानी मिळून संगनमत करून त्या बिलाची रक्कम अदा केली आहे,
त्यामुळे या बाबीस सभापती व सचिवास जबाबदार धरून त्यांच्याकडून सदरची रक्कम वसूलीस का करू नयेत असा ईशारा दिला आहे.
iii) दि. 18.06.2021 रोजी किर्द पा क्र 42 वर अविक्रीय माल खरेदी म्हणून रु.100000/- खर्चाची नोंद आहे. सदरची रक्कम ही चौधरी इलेक्ट्रीकल यांना शेतकी निवास कार्यालय लाईट फिटींगसाठी ॲडव्हान्स दिलेली आहे. त्याची अदयाप बिले सादर केली नाहीत.तसेच याबाबत मागणी पत्र किंवा लेखी आदेश तपासनी वेळी दिसून आले नाहीत.त्यामुळे झालेल्या खर्चाची खातरजमा होऊ शकत नाही. परंतु बिले अदयाप सादर केली नाहीत त्यामुळे कोणत्या फिंटीगचे व किती फिटींगचे काम केले त्याचे दर काय व प्रत्यक्ष काम किती झाले हे समजून येत नाही तसेच त्यांनी प्रत्यक्ष काम केले आहे.किंवा नाही हे ही समजून येत नाही असे असतानाही संबधीत व्यापारी
,तत्कालीन सभापती व तत्कालीन सचिव सर्वानी मिळून संगनमत करून त्या बिलाची रक्कम अदा केली आहे,त्यामुळे या बाबीस सभापती व सचिव जबाबदार का धरण्यात येऊ नये? त्यामुळे सदरची रक्कम वसूलीस पात्र असल्याचा ईशारा दिला आहे.
iv) दि. 29.06.2022 रोजी किर्द पा क्र 46 वर बांधकाम खर्च रु 213750/- चौधरी मार्बल ग्रेनाईट यांना धनादेशाद्वारे रक्कम अदा केलेली नोंद आहे. कोणत्या वस्तू खरेदीसाठी देण्यात आली या बाबत दप्तरी कसलेही नोंद दिसून आली नाही,
तसेच मागणी पत्र किंवा कोटेशन घेतल्याचे दिसून येत नाही किंवा याबाबत वर्तमानपत्रात जाहीरात दिल्याचे दिसून येत नाही तसेच 12(1) ची मंजूरी घेतली नाही. त्यामुळे केलेल्या खर्चाची खातरजमा होऊ शकत नाही. माजी सभापती व सचिवांनी संबधीत व्यापा-याने खर्चाची बिले सादर केलेली नसताना संबधीत व्यापारी, तत्कालीन सभापती व तत्कालीन सचिव सर्वानी मिळून संगनमत करून त्या बिलाची रक्कम अदा केली आहे,त्यामुळे या बाबीस आपणास जबाबदार धरूण येऊ नये? त्यामुळे सदरची रक्कम वसूलीस पात्र आहे.
v) दि.29.06.2022 रोजी किर्द पा.क्र.46 वर बांधकाम खर्च रु.282750/- क्लासीक पीओपी यांना धनादेशाद्वारे रक्कम अदा केलेली आहे. त्यांना पूर्वी रु.200000/- अॅडव्हान्स दिले असल्याने रु.82750/- चा धनादेश दिलेला आहे.त्यांना किती पीओपीचे काम दिले, त्याचा दर काय होता, कोणते मटेरियल वापरले याबाबत कोटेशन मागविलेले दिसुन आले नाही. सदर खर्चाची बिले अदयाप सादर केलेली नाहीत.अथवा संबधिताने खर्चाची बिले सादर केलेली नसताना आपण संबधीत व्यापारी,तत्कालीन सभापती व तत्कालीन सचिव सर्वानी मिळून संगनमत करून त्या बिलाची रक्कम अदा केली आहे, त्यामुळे या बाबीस आपणास जबाबदार का धरण्यात येऊ नये? त्यामुळे सदरची रक्कम वसूलीस पात्र आहे.
सिक्स्टी डिग्री या व्यापा-यास रु.181617/- यांना चेकद्वारे रक्कम अदा केले आहेत. सदर रक्कम कोणत्या वस्तू खरेदीसाठी देण्यात आली या बाबत दप्तरी कसलेही नोंद दिसून आली नाही,तसेच मागणी पत्र किंवा कोटेशन घेतल्याचे दिसून येत नाही किंवा याबाबत वर्तमानपत्रात जाहीरात दिल्याचे दिसून येत नाही तसेच 12 (1) ची मंजूरी घेतली नाही. त्यामुळे केलेल्या खर्चाची खातरजमा होऊ शकत नाही.आपण संबधीत व्यापा-याने खर्चाची बिले सादर केलेली नसताना आपण संबधीत व्यापारी,तत्कालीन सभापती व तत्कालीन सचिव सर्वानी मिळून संगनमत करून त्या बिलाची रक्कम अदा केली आहे, त्यामुळे या बाबीस आपणास जबाबदार का धरण्यात येऊ नये? त्यामुळे सदरची रक्कम वसूलीस पात्र आहे.
xiii) दि.24.09.2022 किर्द पा.96 वर रु.51000/- अविक्रीय माल खरेदी मांगुळकर एजन्सीज यांना चेकद्वारे रक्कम अदा केली आहे. सदर रक्कम कोणत्या वस्तू खरेदीसाठी देण्यात आली या बाबत दप्तरी कसलेही नोंद दिसून आली नाही, तसेच मागणी पत्र किंवा कोटेशन घेतल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे केलेल्या खर्चाची खातरजमा होऊ शकत नाही. आपण संबधीत व्यापा-याने खर्चाची बिले सादर केलेली नसताना आपण संबधीत व्यापारी, तत्कालीन सभापती व तत्कालीन सचिव सर्वानी मिळून संगनमत करून त्या बिलाची रक्कम अदा केली आहे, त्यामुळे या बाबीस आपणास जबाबदार का धरण्यात येऊ नये? त्यामुळे सदरची रक्कम वसूलीस पात्र आहे.
xiv) दि.27.09.2022 किर्द पा.97 रु.35000/- सभा खर्च साईबाबा केटर्स यांना धनादेशाद्वारे रक्कम अदा केले आहेत.सदरचा खर्च सोमनाथपूर गोदाम उदघाटनासाठी केलेला आहे. सदचा खर्च हा कश्यासाठी केला आहे हे समजून येत नाही त्यामुळे केलेल्या खर्चाची खातरजमा होऊ शकत नाही. आपण संबधीत व्यापा-याने खर्चाची बिले सादर केलेली नसताना आपण संबधीत व्यापारी, तत्कालीन सभापती व तत्कालीन सचिव सर्वानी मिळून संगनमत करून त्या बिलाची रक्कम अदा केली आहे, त्यामुळे या बाबीस आपणास जबाबदार का धरण्यात येऊ नये? त्यामुळे सदरची रक्कम वसूलीस पात्र आहे.xv) दि.21.10.2022 किर्द पा.114 वर रु.13,72,361/- शेतकी निवास उमा उदयोग लातुर यांना प्लायवुड पार्टेशन व हार्डवेअर कामाकरीता धनादेशाद्वारे रक्कम दिलेली आहे. सदर रक्कम कोणत्या वस्तू खरेदीसाठी देण्यात आली या बाबत दप्तरी कसलेही नोंद दिसून आली नाही, तसेच मागणी पत्र किंवा कोटेशन घेतल्याचे दिसून येत नाही किंवा याबाबत वर्तमानपत्रात जाहीरात दिल्याचे दिसून येत नाही तसेच 12 (1) ची मंजूरी घेतली नाही.त्यामुळे केलेल्या खर्चाची खातरजमा होऊ शकत नाही.
आपण संबधीत व्यापा-याने खर्चाची बिले सादर केलेली नसताना आपण संबधीत व्यापारी, तत्कालीन सभापती व तत्कालीन सचिव सर्वानी मिळून संगनमत करून त्या बिलाची रक्कम अदा केली आहे, त्यामुळे या बाबीस आपणास जबाबदार का धरण्यात येऊ नये ? त्यामुळे सदरची रक्कम वसूलीस पात्र आहे.xvi) दि.26.10.2022 किर्द पा.क्र.117 वर रु. 190500/- सभा खर्च अमर लाईट डेकोरेशन यांना रक्कम चेकद्वारे अदा केले. सदर खर्च सोमनाथपूर गोदाम उदघाटनासाठी केलेला आहे. सदर खर्चाची बिले अदयाप सादर केलेली नाहीत तसेच याबाबत कोटेशन मागविलेले दिसून आले नाही. अथवा संबधिताने खर्चाची बिले सादर केलेली नसताना आपण संबधीत व्यापारी, तत्कालीन सभापती व तत्कालीन सचिव सर्वानी मिळून संगनमत करून त्या बिलाची रक्कम अदा केली आहे,त्यामुळे या बाबीस आपणास जबाबदार धरूण सदरची रक्कम वसूलीस पात्र आहे.xvii) दि.26.10.2022 किर्द पा.क्र.117 वर रु. 152420/- सभा खर्च नमूद असून श्री प्रकाश यांना जेवनाचे बिल अदा केले आहे सदर खर्च सोमनाथपूर गोदाम उदघाटनासाठी केलेला आहे.सदर रक्कम कोणत्या कारणासाठी देण्यात आली या बाबत दप्तरी कसलेही नोंद दिसून आली नाही,
तसेच मागणी पत्र किंवा कोटेशनघेतल्याचे दिसून येत नाही किंवा याबाबत वर्तमान पत्रात जाहीरात दिल्याचे दिसून येत नाही तसेच 12 (1) ची मंजूरी घेतली नाही. त्यामुळे केलेल्या खर्चाची खातरजमा होऊ शकत नाही.वरील सर्व बाबीची कार्यकारी मंडळ सदस्य या नात्याने आपणास माहिती असताना सुध्दा आपण संबधीत व्यापा-याने खर्चाची बिले सादर केलेली नसताना आपण संबधीत व्यापारी, तत्कालीन सभापती व तत्कालीन सचिव सर्वानी मिळून संगनमत करून त्या बिलाची रक्कम अदा केली आहे,त्यामुळे या बाबीस जबाबदार धरूण सदरची रक्कम वसूलीस पात्र आहे.वर नमूद केल्या प्रमाणे मुद्या क्रमांक 01 ते 11 नुसार होणारी बेरीज 1,42,06,713/- व मुद्या क्रमांक 12 मध्ये नमुद केलेल्या मुद्यनिहाय खर्चाची रक्कम रू 50,37,332/- अशी एकुण रक्कम रू 1,92,44,045/- रूपयाचा आर्थीक गैरव्यवहार केल्याचे दिसून येते.याबाबीस संस्थेचे तत्कालीन सभापती सचिव व संचालक मंडळ वैयक्तीक रित्या जबाबदार असून सदरची रक्कम 7 दिवसाच्या आत भरणा करावी व याबाबतचा वर नमुद केल्या प्रमाणे मुद्येनिहाय योग्य तो खुलासा कागदोपत्री पुराव्यानिशी या कार्यालयास 7 दिवासाच्या आत सादर करावा.सात दिवसाच्या आत खुलासा समर्पक व कागदोपत्री पुराव्यानिशी नसल्यास आपणाविरूध्द पुढील योग्य ती कायदेशीरकार्यवाही करण्याची नोटीस उ. ल. पवार)जिल्हा विशेष लेखापरिक्षक वर्ग -1सहकारी संस्था, लातूर. यांनी तत्कालीन सभापती व सचिव यांना पाठवून दिली आहे.
Discussion about this post