भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम.मुंबई कांदिवली पश्चिम येथील जेष्ठ पत्रकार, कवी, लेखक गीतकार सामाजिक कार्यकर्ता भारत कवितके यांनी चारकोप विधानसभा मतदारसंघातून विधानसभा 2024 लढविण्यासाठी सर्व स्तरातील नागरिकांची मोठी मागणी होत आहे.चारकोप विधानसभा मतदारसंघातील परिवर्तन घडावे,असे नागरिक प्रतिक्रिया देताना आढळून येतात.सामान्य माणसाच्या सुखदुःखात धावून जाणारे, निस्वार्थी पणे भारत कवितके मदत करतात.बस फेरीत बदल,मार्गा मध्ये बदल, विभागातील कमी दाबाने पाणीपुरवठा होत असताना त्यात बदल करून निवेदने देऊन जास्त दाबाने पाणीपुरवठा करुन वेळ वाढविली ,
श्री सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्थेत भारत कवितके महासचिव पदावर कार्यरत आहेत त्यांनी एस.आर.ए.च्या योजनेत रहिवाशांना पात्र करण्यासाठी कागदपत्रे सादर करण्यासाठी मदत केली.जवळ जवळ या संस्थेचे 75टक्के रहिवासी पात्र झाले.चारकोप येथील धनगर समाज विकास मंडळाच्या प्रवक्ते पदावर भारत कवितके कार्यरत आहेत.समाजाच्या वधू वर मेळावा, स्नेहसंमेलन यात आयोजन नियोजन मध्ये भारत कवितके अग्रेसर असतात.रुग्णालयीन मदतीची गरज असणारे रुग्णांना मदत करणेसाठी भारत कवितके अग्रेसर असतात, बाहेर गावी ये जा करणारे एसटी बस च्या मार्गात वेळेत बदल घडवून आणला,अशा प्रकारेच्या सुधारणा भारत कवितके यांनी आपल्या लिखाणातून, निवेदनाद्वारे घडवून आणल्या आहेत.यावर भारत कवितके यांनी आपली प्रतिक्रिया दिली की,” जनतेला परिवर्तन, बदल हवा आहे,जनतेनी मला साथ द्यावी, मी विधानसभा लढविण्यास तयार आहे.”यासाठी भारत कवितके यांनी राष्ट्रीय समाज पक्षाकडे चारकोप विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारी मिळावी म्हणून मागणी केलेली आहे,त्यास प्रतिसाद मिळत आहे.
Discussion about this post