शिरोळ तालुका प्रतिनिधी / शिरोळ तालुक्यातील तमाम जनतेला भेडसावणाऱ्या समस्या या विधानमंडळात म्हणून आपल्या सेवेची संधी मला मिळावी. आजपर्यंतच्या आमदारांनी सर्वसामान्यांचे प्रश्न हे विधान मंडळात मांडलेच नाहीत त्यामुळे शिरोळ सारख्या जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या तालुक्यात अजूनही समस्या भेडसावत आहेत. यामध्ये महापुराची समस्या आहे, यामध्ये शेतकऱ्यांची समस्या आहे, यामध्ये महिलांच्या सुरक्षेतेचा प्रश्न आहे यामध्ये सामाजिक समतोल राखण्याचा प्रश्न आहे, यामध्ये बहुजनांना न्याय मिळणं हा महत्त्वाचा प्रश्न आहे असे महत्त्वाचे प्रश्न असताना विद्यमान आमदारांनी विधान मंडळात पाच वर्षात एकही प्रश्न मांडलेला नाही. त्यामुळेच मी तमाम जनतेला विनंती करते की, मी गजाला मुबीन मुल्ला आष्टेकर एक सर्वसामान्य शेतकऱ्याची मुलगी असून मिरज तालुक्यातील खटाव या ग्रामीण भागात लग्न पर्यंतचा काळ झाला. मी आजही पदवीचे शिक्षण घेत आहे तेही जयसिंगपूर महाविद्यालयात.

जुलै 2022 मध्ये माझा विवाह झाला आणि अल्पावधीतच म्हणजे अवघ्या दोनच वर्षात मी समाजातील परिस्थिती समजून घेऊन राजकारण व समाजकारणाच्या प्रकाश झोतात उदयास आली. माझे पती श्री. मुबीन मुल्ला आष्टेकर हे शिरोळ तालुक्यात गेल्या पंधरा वर्षापासून पक्षाचे काम व सर्वसामान्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, कष्टकऱ्यांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम त्यांनी केलं आहे, त्यांच्या राजकीय जडणघडणीत 650 हून अधिक आंदोलने 45 हुन अधिक उपोषणे करून सर्वसामान्यांना न्याय द्यायचा प्रयत्न त्यांनी प्रामाणिकपणे केलेला आहे. याबाबतचे पुरावे आजही उपलब्ध आहेत. कोट्यावधी रुपयांचा विकास केला हे कागदोपत्री दाखवून सर्वसामान्यांची दिशाभूल करण्याचे काम विद्यमान, प्रस्थापित, लोकप्रतिनिधी करत आहेत याची जाणीव सर्वसामान्यांना होण्ं ही काळाची गरज आहे. शिरोळ तालुका हा सहकाराचा केंद्रबिंदू आहे.
स्वर्गीय रत्नाप्पाण्णा कुंभार, स्वर्गीय दत्ताजीराव कदम, स्वर्गीय भाई दिनकरराव यादव, स्वर्गीय आप्पासाहेब उर्फ सारे पाटील, स्वर्गीय शामराव पाटील यड्रावकर या सहकार महर्षींनी शिरोळ तालुक्यात सहकार्याला एक दिशा दिली पण याच सहकाराच्या माध्यमातून विद्यमान सहकार नेते मंडळींनी कोट्यावधीची लूट केली आहे. आज तालुक्यातील युवक बेरोजगार झाला आहे सदर भ्रष्टाचार उघडकीस आणून सर्वसामान्यांना त्यांचा न्याय देणे हे काम मी येणाऱ्या काळात करेन, तालुक्यातील माता-भगिनी असुरक्षित आहेत, त्यांच्या जडणघडणीबाबत अनेक प्रश्न आहेत, ते सोडवण्याचा काम मी नक्कीच करेन.
टक्केवारी देण्यात मी असमर्थ ठरेन त्यामुळे थोडासा विकास कमी होईल पण सर्वसामान्यांचा प्रश्न सोडवण्यात मी कधीच मागे हटणार नाही. मी एक शेतकऱ्याची मुलगी आहे त्यामुळे सदर प्रश्नांची मला जाणीव आहे.
Discussion about this post