
अमळनेर – ( प्रतिनिधी ) :
साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांच्या शाक्षीने अमळनेरात अहिराणीचा जागर होणार आहे. अहिराणी साहित्य परिषद धुळे व धनदाई माता एज्युकेशन सोसायटीच्या संयुक्त मध्यमाने दिनांक 30 व 31 मार्च 2025 रोजी पाचव्या राज्यस्तरीय अहिराणी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. अहिराणी भाषेतून कथा, कविता, परिसंवाद व सांस्कृतिक कार्यक्रम यांची मेजवानी मिळणार आहे अमळनेर शहरात मध्यवर्ती असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात होणार आहे. यामध्ये प्रमुखतः ग्रंथ दिंडी व शोभायात्रा अहिराणी भाषेतून आलेल्या वैविध्यपूर्ण कविता तसेच खानदेशचे वैशिष्ट्ये ,विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे मेजवानी तसेच अहिराणी बोली भाषेचे महत्त्व स्पष्ट करा परिसंवाद, खानदेशी लोक परंपरा व खानदेशी माणसाचे स्वभाव वैशिष्ट्य टिपणार्या दर्जेदार कथा, अहिराणी गाणी, नृत्य आदिंचा या साहित्य संमेलनात समावेश असणार आहे तसेच या निमित्ताने अहिराणी साहित्य क्षेत्रात सेवा देणाऱ्या नामवंत साहित्यिकांना अहिराणी भूषण पुरस्कार आणि अहिराणी भाषेचा प्रचार प्रसार करणाऱ्या कलावंतांना अहिराणी गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे यामध्ये विशेषतः अहिराणी भाषा शब्दकोश तयार करणे डॉ.रमेश सूर्यवंशी ‘ताई मी कलेक्टर व्हयनु’ यासारख्या पुस्तकातून व्यक्त होणारे आय.ए.एस.अधिकारी राजेश पाटील उपस्थित राहणार आहेत. सदर संमेलनास जास्तीत जास्त रसिकांनी उपस्थित राहून अहिराणी भाषेचा गौरव वाढवावा असे आवाहन आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केले.अहिराणी साहित्य परिषदेचे अध्यक्ष भगवान पाटील ( धुळे,) सचिव प्रभाकर शेळके तसेच स्थानिक संमेलन समितीतील धनदाई माता एज्युकेशन चे अध्यक्ष नानासो. डी.डी. पाटील. उपाध्यक्ष के. डी. पाटील. युवा कल्याण प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रा.अशोक पवार प्राचार्य ,डॉ.लीलाधर पाटील. अर्बन बँकेचे व्हा.चेअरमन रणजीत शिंदे,वसुंधराताई लांडगे, गोकुळ बागुल डॉ.कुणाल पवार, डॉ. दत्ता ठाकरे आदींनी केले आहे…
Discussion about this post