
अतिशय दु:खद आहे. मूळचे नागपूरकर असलेल्या आणि बालपणापासून स्वयंसेवक असलेल्या डॉ. शंकरराव तत्त्ववादी यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून डॉक्टरेट केली होती.आणि तेथेच सेवा देत असताना त्यांनी स्वेच्छानिवृत्ती पत्करुन पूर्णवेळ संघकार्य करण्याचा निर्णय घेतला. ब्रिटनमध्ये प्रचारक म्हणून कार्य केल्यानंतर ते विश्व विभागाचे संयोजक बनले. विश्व संघ शिक्षा वर्ग, विश्व संघ शिबीर असे अनेक उपक्रम त्यांनी चालविले. विज्ञान भारतीलाही सातत्याने मार्गदर्शन करण्याचे काम त्यांनी केले.
राष्ट्रनिर्माणासाठी त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील.
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली …
Discussion about this post