
प्रतिनिधी, पांडुरंग गाडे..
श्रीक्षेत्र येलवाडी ग्रामपंचायतचे उपसरपंच प्रदीप गायकवाड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी आज येलवाडी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये येलवाडी गावचे विद्यमान सरपंच रणजीत गाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत सदस्य सौ बेबीताई जालिंदर पाटोळे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे उपसरपंच पदाची निवडणूक ही बिनविरोध झाली आहे . निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक पुनम शेवाळे यांनी काम पाहिले
या निवडणूक प्रक्रियेच्या वेळी खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विद्यमान सरपंच श्री रंणजीत गाडे. मा. उपसरपंच प्रदीप गायकवाड. मा. उपसरपंच मनीषा चौधरी,मा.उपसरपंच गोवर्धन बोत्रे, मा.उपसरपंच सुजाता गाडे, मा. उपसरपंच प्रशांत गाडे, मा. उपसरपंच प्रज्ञा बोत्रे, ग्रामपंचायत सदस्य उर्मिला गायकवाड, युवा उद्योजक जीवन बोत्रे, अमित बवले, अतुल गाडे, गणेश गाडे,शिवाजी देवकर, पै. गणेश पाटोळे यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता..
Discussion about this post