
यावल प्रतिनिधी, फिरोज तडवी..
जिल्हाधिकारी सो श्री आयुष प्रसाद सो,मतदान जनजागृती कार्यक्रम (स्वीप) जिल्हा नोडल अधिकारी मान. अकलाडे रॅली चे आयोजन केले जात आहे, यावल तालुक्यातील कोरपावली गावांत डी एच जैन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गावात रॅली चे आयोजन करत मतदान जनजागृति कार्यक्रमांचे👍🏽 आयोजन करण्यात आले.
डी . एच .जैन विद्यालयाचे कर्मचारी व प्राथमिक शाळेचे कर्मचारी, आशा वर्कर , अंगणवाडी सेविका पोलीस , Blo , ग्रामस्थ आदि सर्व उपस्थित होते . कोरपवलीच्या आशा वर्कर हिराताई पांडव ,हसीना ताई तडवी नजमाताई तडवी यांनी लक्षवेधी रांगोळीच्या माध्यमातून मतदान जनजागृती केली.
कोरपावलीचे blo श्री संतोष वानखेडे सर यांनी मतदार जनजागृती मोहीम या संदर्भातील सर्व माहिती ग्रामस्थांना दिली व येणाऱ्या 20 नोव्हेबर या तारखेला विधानसभा चोपडा मतदार संघात सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावा असे सर्वांना आव्हान केले.
Discussion about this post