
बँक खात्याची केवायसी करण्यासाठी सकाळपासूनच महिला रांगेमध्ये उभ्या राहत आहेत. मागील दोन महिन्यापासून हीच परिस्थिती आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभाची रक्कम डीपी द्वारे बँक खात्यामध्ये आली आहे. ही रक्कम आधार कार्ड संलग्न असलेल्या बँक खात्यात जमा होत आहे. काही महिलांचे खाते बंद आहेत. तर काही च्या खात्याची केवायसी झालेली नाही. त्यामुळे महिला बँका समोर गर्दी करीत असल्याचे दिसत आहे. बँकांनी केवायसी करण्याची वेळ दुपारी 2. वाजेपर्यंत ठेवली आहे. काही महिला केवायसी साठी तर काही महिला खात्यात जमा असलेली रक्कम काढण्यासाठी बँकेत येत आहेत.
बँक खात्याची केवायसी करण्यासाठी महिलांची गर्दी इतर ग्राहकांना अडचण करीत आहे.
सकाळपासूनच बँकेसमोर महिलांच्या रांगा लागत आहेत. बँकेत येणारे इतर व्यवसायिक व ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे. रांगेत असलेल्या महिला सोबत वादाच्या घटना घडत आहेत. बँकेत रक्कम भरण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना रांगेतील महिला बँकेत जाऊ देत नसल्याने अडचणीत वाढ होत आहे. बँकांनी आपल्या कामकाजाच्या वेळा बदलल्याने समस्या आणखी वाढली आहे. बँकेमध्ये काउंटर वाढवून चांगल्या सुविधा द्याव्यात अशी मागणी बँक ग्राहकांमधून केली जात आहे.
परभणी नगरी न्युज.
पत्रकार राजकुमार शर्मा..
Discussion about this post