दरम्यान चला फॉर्म भरायला या रॅलीची सुरवात गोलाई चौक येथून सुरवात झाली व नगर परिषद समोर भव्य जाहीर सभा घेण्यात आली. या सभेस भूम परंडा वाशी तालुक्यातून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी जनसमुदयास बोलताना राहुल मोटे म्हणाले कि, आपली लढाई ही शेतकऱ्यांची अवकात काढणारे, संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा एकेरी उल्लेख करणारे, महाराष्ट्र राज्याला भिकारी बनवणाऱ्या, आरक्षणाची खाज सुटणाऱ्या म्हणणाऱ्या, यांचबरोबबर पक्षाशी गद्दारी करणाऱ्या नाव न घेता तानाजी सावंता विरोधात असल्याचे म्हटले.
शरद पवार यांच्या विचाराशी एकनिष्ठ असणाऱ्या, शांत फक्त विकास कामांचे ध्येय असणाऱ्या, जनतेच्या सेवेसाठी कधीही उपलब्ध असणाऱ्या राहुल मोटेना विजयी करण्याचे आवाहन केले. त्यांचबरोबर शासनाने जनतेच्या पैशांची उधळवावडो करत तिजोरी रिकामी केली असल्याचा आरोपही जयंत पाटिल यांनी यावेळी शासनावर केला. महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर लाडकी बहीण योजना सक्षमपणे राबवून अजून त्यामध्ये वाढीव निधी उपलब्ध केला जाईल असे जयंती पाटील यांनी बोलताना सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशअध्यक्ष जयंत पाटिल, मा. आ राहुल मोटे, महिला प्रदेश अध्यक्ष सक्षणा सलगर, महिला विभागीय अध्यक्षा वैशाली मोटे, रणजित मोटे, संजय पाटिल आरसोलीकर, हनुमंत पाटुळे, राहुल बनसोडे, नितीन बिक्कड, काँग्रेस चे रुपेश शेंडगे, सिराज मोगल, मोईज सय्यद, समो्योद्दीन काझी, आबासाहेब मस्कर, रमेश मस्कर ,पाशाभाई शेख ,भगवान पाटिल, राजकुमार घरात, राहुल पाटिल, भाऊसाहेब मारकड, श्रीराम खंडागळे आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
Discussion about this post