
काल दिनांक ३०आक्टोबर रोजी राजेश एकडे यांच्या प्रचारासाठी निमगाव सर्कलमधील पळसोडा, नविन कोदरखेड, अलमपुर,पातोंडा, खरकुंडी,नवी येरळी,जुनी येरळी,बेलाड,दादगांव,रोटी,भोटा,हिंगणा खवले व हिंगणा अवचार या अकरा गावांमध्ये जनसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.या जनसंवाद यात्रेचे गावोगावी धुमधडाक्यात स्वागत करण्यात आले.
या जनसंवाद यात्रेत गावोगावी शेकडो भिमसैनिक सहभागी झाले.या निवडणुकित जातियवादी व धर्मांध शक्तींना रोखण्यासाठी आपले मत कांग्रेस पक्षाचे उमेदवार आमदार राजेश एकडे यांनाच देण्याचा संकल्प भिमसैनिकांनी केला असुन आपण आता आपले मत वाया घालवून जातियवादी पक्षांना फायदा होऊ देणार नाही असा निर्धार भिमसैनिकांनी व्यक्त केला आहे.त्यामुळे आमदार राजेश एकडे यांचा विजय निश्चित झाल्याची चर्चा जनमानसात ऐकायला मिळत आहे.
Discussion about this post