आता फक्त पाडापाडी नाही, तर गरजवंत मराठा सत्ता हस्तगत करणार
आज आंतरवलीत मराठा, मुस्लिम, दलित नेतृत्वाची महत्वाची बैठक पार पडली. मनोज जरांगे पाटील, सज्जाद नोमानी, राजरत्न आंबेडकर, आनंदराज आंबेडकर यांची मुख्य उपस्थिती होती.*
बैठकीत काय ठरलं
मराठा, मुस्लिम, दलित, लिंगायत व मायक्रो ओबीसी यांनी एकत्रित येऊन येऊन निवडणुकीला सामोरे जावे यावर सर्वांचे एकमत झाले-
लवकरच लिंगायत, महानुभाव पंथ, मायक्रो ओबीसी यांचीही बैठक पार पडणार- प्रत्येकाला आपल्या धर्माचे पालन करण्याचा अधिकार, एकमेकांच्या धर्मामध्ये कोणीही हस्तक्षेप करणार नाही- आजवर धर्मा-धर्मात वाद लावून गरिबांना झुंजवत ठेवले आणि सत्ता हस्तगत केली – परंतु राजसत्ता हि कोणाची मक्तेदारी नाही. लोकशाहीने प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार दिला- प्रचारसभेचा झंजावात सुरु होईल तेव्हा मराठा, मुस्लिम, दलित, मायक्रो ओबीसी बांधवांनी प्रचंड संख्येने सहभाग घ्यावा- यावेळी मराठा, मुस्लिम, दलित, मायक्रो ओबीसी बांधवांनी १००% मतदान करावे- जिथे मराठा उमेदवार तिथे मुस्लिम, दलित व मायक्रो ओबीसी ताकतीने मतदान करतील- तसेच जिथे मुस्लिम व दलित (आरक्षित), ओबीसी उमेदवार तिथे मराठा ताकतीने साथ देणार
७५ वर्षानंतर गरिबांची लाट आली, अशी संधी पुन्हा नाही- लवकरच एकत्र बसून Common Minimum Program (किमान सामान कार्यक्रम) जाहीर करणार- कोणते मतदारसंघ व उमेदवार कोण हे ३ तारखेला जाहीर करणार- ठरल्याप्रमाणे ४ तारखेला इतर उमेदवार अर्ज मागे घेतील व स्टार प्रचारकाची जबाबदारी सांभाळतील – महाराष्ट्र फक्त सुरुवात आहे. याच सूत्राने देशात परिवर्तन घडणार व त्या क्रांतीचे नेतृत्व मनोज जरांगे पाटील करणार.सांगितले होते.. समाजकारणात हलक्यात घेतले तसे राजकारणात हलक्यात घेऊ नका असे जरांगे पाटील म्हणाले.
Discussion about this post