🍾🍾
वर्धा सेलू
आकोली : सेलू तालुक्यातील अवघ्या 15 किलोमीटर असलेला गाव आकोली या गावातील खुलेआम दारू विक्री रोज रोज मोठ्या प्रमाणात सुरू आहे तरी सेलू पोलीस स्टेशन विभागाचे याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे आकोली गावात अवैध रीतीने गावठी दारूधंदे जोरात सुरू आहेत एखादी कारवाई केल्यानंतर हे धंदे पुन्हा पुन्हा सुरू कसे होतात असा प्रश्न गावकऱ्यांना उपस्थित होत आहे. या गावठी दारू धंद्यांमुळे अनेक कुटुंबं उद्ध्वस्त होत आहेत.
गावठी दारूचा सर्वात जास्त गरीब, हातावर कमवणारे वर परिणाम होत आहे तसेच ही अवैध गावठी दारू रासायनिक प्रक्रिया करून बनवण्यात येते. त्यामुळे त्याचा आरोग्यावर दुष्परिणाम होतो. म्हणूनच हे अवैध गावठी दारू धंदे बंद करावेत, अशी मागणी येथील गावकरी केली आहे येथील आसपासच्या परिसरामध्ये गावठी दारू बनवली जाते. गावठी दारूच्या अवैध विक्रीवर कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांनादेखील आहेत. परंतु, अवैध दारु रोखण्यात अद्याप समाधानकारक कारवाई झालेली दिसत नसल्याचे गावकर चे म्हणणे आहे. खूप दारू विक्रेत्यापासून खूप कंटाळून गेले आहे तरी या गावाकडे सेलू पोलीस स्टेशन चे अजिबात लक्ष दिसत नाही तरी सेलू पोलीस स्टेशन यांनी ताबडतोब या गावातली गावकऱ्याचे म्हणणे ऐकून ताबडतोब खुलेआम दारू विक्री बंद करण्यात यावी 🙏🙏
✍️✍️✍️✍️
सौरभ गव्हाळे
बातमी लेखक
Discussion about this post