

हडपसर,वार्ताहार.साधना विद्यालय व आर.आर.शिंदे ज्यु.कॉलेज,हडपसर मधील राष्ट्रीय हरित सेना योजनेमार्फत पर्यावरणपूरक आकाशकंदील बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली.या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असताना, “पर्यावरणपूरक आकाशकंदील वापरल्याने प्लास्टिकचा वापर कमी होऊ शकतो तसेच प्लास्टिकमुळे होणारे दुष्परिणामही कमी होऊ शकते आणि पर्यावरणपूरक आकाशकंदील वापरणे काळाची गरज आहे तसेच सर्वांनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करावी, कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव मिळतो”,असे मत साधना विद्यालय व आर.आर.शिंदे ज्यु.कॉलेजचे प्राचार्य दत्तात्रय जाधव यांनी मांडले.
यावेळी विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक आकाशकंदील बनविले तसेच फटाकेमुक्त व पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचा निश्चय सर्व विद्यार्थ्यांनी केला.
या कार्यशाळेचे आयोजन साधना विद्यालय व आर.आर.शिंदे ज्यु.कॉलेजचे प्राचार्य दत्तात्रय जाधव, उपमुख्याध्यापिका योजना निकम, पर्यवेक्षक शिवाजी मोहिते,पर्यवेक्षिका माधुरी राऊत, राष्ट्रीय हरित सेनेचे व पर्यावरण विभागाचे प्रमुख शैलेश बोरुडे, साधना खोत, धनश्री पाटील, तेजस्विनी गायकवाड व राणी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले..
Discussion about this post