
खेड(प्रतिनिधी)
दापोली हून मिरज ला जाणाऱ्या बस ला कुवेघाटी नजीक ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाला. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
दापोली हून मिरज कडे जाणारी एस.टी. बस ( क्रमांक – एम एच १४ बीटी ३६९० ) या गाडीचा ब्रेक निकामी होऊन अपघात झाला. या बसचे चालक संजय जाधव यांनी बस वर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु बस रस्ता सोडून रस्त्याच्या डाव्या बाजूला रस्ता सोडून वीस फुट खोल खड्ड्यात गेली. यावेळी एस.टी. बस मध्ये अंदाजे पंचवीस प्रवासी प्रवास करीत होते. त्यातील एका प्रवाशाला गंभीर दुखापत झाली असुन अन्य दहा प्रवाश्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. या प्रवाशांना जगद्गुरू नरेंद्राचार्य सस्थांन नाणिज यांच्या रुग्णवाहिकेने उपचारार्थ प्राथमिक आरोग्य केंद्र फुरुस येथे दाखल करण्यात आले आहे.
Discussion about this post