
संविधानविरोधी शक्ती रोखण्यासाठी मविआचे उमेदवार प्रशांत यादव यांना पाठिंबा..
चिपळूण :- सध्या अप्रत्यक्षपणे सर्वसामान्यांच्या हक्क आणि अधिकारांवर गदा आणण्याचे प्रयत्न सुरु असून आरक्षण संपविण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे संविधान विरोधी शक्ती रोखण्यासाठी चिपळुणातील रिपब्लिकन पक्षांच्या बहुसंख्य आजी, माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तुतारी वाजविण्याचा निर्णय घेतला असून महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. गावागावात झोकून काम करीत श्री. यादव यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचा निर्धारही कार्यकर्त्यांनी केला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती, रिपब्लिकन कार्यकर्ते मनोहर मोहिते, सुभाष मोहिते, संजय गमरे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (दि.२९) रिपब्लिकन पक्षाचे चिपळुणातील आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली.
यावेळी सौ. स्वप्ना यादव, शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे चिपळूण तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर, शिवसेना ठाकरे गटाचे चिपळूण शहरप्रमुख शशिकांत मोदी, काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष लियाकत शाह, राष्ट्रवादीचे श शहराध्यक्ष रतन पवार, संगमेश्वर उपतालुकाध्यक्ष सचिन जाधव, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा विभावरी जाधव, फैसल पिलपिले यांच्यासह रिपब्लिकन कार्यकर्ते मनोहर मोहिते, सुभाष मोहिते, संजय गमरे, रमण मोहिते, संदेश कदम, जयराम मोहिते, प्रवीण जाधव, संतोष मोहिते, महेंद्र कदम, मिलींद कदम, संजय सावंत, जयसिंग सावंत, लक्ष्मण कदम, दीपक कांबळे, काळूराम सकपाळ, प्रफुल्ल जाधव, प्रफल मोहिते, मुजफ्फर मुल्ला, अशोक मोहिते, आशिष कांबळे, लक्ष्मण कदम, विजय गमरे, रितेश जाधव, काळुराम सकपाळ, नितिन जाधव, योगेश गमरे आदी उपस्थित होते.
यावेळी केवळ रस्ते, पाखाड्या, पाणी योजनेसह मुलभूत सुविधा म्हणजे विकास नसून सामाजिक, आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सर्वांगिण विकासाला प्राधान्य देणाऱ्या तसेच चळवळीशी बांधिलकी जपणाऱ्या एकनिष्ठ उमेदवाराला पाठिंबा देण्याचा सुर या बैठकीत उमटला, दूरदृष्टी असलेले प्रशांत यादव यांनी आज वाशिष्ठी मिल्क अॅण्ड मिल्क प्रॉडक्ट प्रकल्पाच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांना रोजगार दिला असून कृषिसह विविध क्षेत्राच्या सर्वांगिण विकासाचे व्हिजन त्यांनी ठेवले आहे. त्यामुळे त्यांच्या पाठिशी ठाम उभे राहाण्याचा निर्धार रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी केला.
यावेळी मनोहर मोहिते, सुभाष मोहिते, संजय गमरे यांनी बौध्दवाडीच्या पुनर्वसनसह विविध मुख्य प्रश्न मांडत ते सोडविण्याबरोबरच वाडी- वस्तीचा विकास आणि तरुणाना रोजगार अशा मागण्या केल्या.
शिवसेना ठाकरे गटाचे चिपळूण शहरप्रमुख शशिकात मोदी, काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष लियाकत शाह यांनी ही निवडणूक व्यक्ती विरोधात नसून विचाराच्या विरोधात आहे, असे सांगतानाच आज महागाईने उच्चांक गाठला आहे. जीएसटीच्या नावाखाली लुटमार सुरु असून ती रोखण्यासाठी श्री. प्रशांत यादव यांना भरघोस मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन केले.
सर्वांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरवू : स्वप्ना यादव
प्थेच्या यावेळी वाशिष्ठी डेअरीच्या मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांनी सर्वांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरवून पुढील निवडणुकीत देखिल आपण श्री. यादव यांचाच विचार कराल असे परिवर्तन घडवू, असा विश्वास व्यक्त केला.
घरी बसविण्याचीही बौध्द समाजामध्ये ताकद – अडरेकर
कोणता समाज कोणाकडे हे कोणी गृहीत धरून वल्गना करु नयेत. कोण कोणाबरोबर हे लोकसभा निवडणुकीमध्ये समजून आले. आता विधानसभेतही त्याची पुनरावृत्ती होणार असून ज्यांना निवडून दिले. त्यांना घरी बसविण्याची ताकद देखिल बौध्द समाजामध्ये आहे. त्यामुळे आता अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचे यावेळी शरद पवार राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर म्हणाले.
Discussion about this post