
यवतमाळ: शहरातील धामणगाव मार्गावर पुलगाव वरून यवतमाळ कडे येणाऱ्या पुलगाव डेपोच्या एसटी बसने अचानक पेट घेतला. यामुळे बसमधील प्रवाशांची एकच टाळांबर उडाली. तातडीने बस खाली करण्यात आली. ही घटना शनिवारी सायंकाळी ६.३० वाजता घडली. ( एम एच ४०, एन ९३८९ ) क्रमांकाची ही बस पुलगाव येथून यवतमाळ कडे येत असताना हा प्रकार घडला. अग्निशामक दलाला प्रचारण करून आग विजवण्यात आली. मात्र बस पूर्णतः खाक झाली.
Discussion about this post