
यावेळी कुर्ला विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा त्यांनाच प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन कुर्ला विधानसभा मतदारसंघातील मतदार बंधू भगिनींना केले.
याप्रसंगी सर्वप्रथम बौद्ध विहारात जाऊन भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. त्यानंतर मंचावर येताच कुर्ला मतदारसंघातील हजारो लाडक्या बहिणींनी मला ओवाळून अनोखी भाऊबीज साजरी केली. त्यांनी दाखवलेला स्नेह आणि विश्वास हीच माझी खरी ताकद असल्याचे मत यासमयी व्यक्त केले.
यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या स्थानिक मतदार बंधू भगिनींना संबोधित करताना राज्यातील महायुती सरकार हे सर्वसामान्य माणसाचा विचार करणारे सरकार असल्याचे नमूद केले. त्यामुळेच महिला भगिनींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुलींसाठी लेक लाडकी लखपती योजना, ज्येष्ठांसाठी वयोश्री योजना, मुलींना मोफत शिक्षण मिळावे यासाठी उच्च शिक्षण मोफत देणारी योजना, जे तरुण बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी मुख्यमंत्री युवा कौशल्य विकास योजना अशा अनेक योजना सुरू केल्या असल्याचे अधोरेखित केले. राज्यातील आमचे महायुतीचे सरकार हे देणारे सरकार असून आधीचे सरकार हे फक्त घेणारे सरकार होते असे सांगितले.
मुंबईत बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु केला, शहरातील रस्ते खड्डेमुक्त केले, मुंबईत ठिकठिकाणी डीप क्लिन ड्राइव्ह सारखी मोहीम राबवली, तसेच कोस्टल रोड, एमटीएचएल आणि मेट्रोद्वारे मुंबईकरांचा प्रवास अधिक गतिमान आणि सुखकर केल्याचे याप्रसंगी सांगितले.
महिलांना सक्षम करणारे आपले सरकार आहे, मात्र याच महिला भगिनींसाठी सुरू केलेली लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी महाविकास आघाडीच्या लोकांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला. त्यामुळे ते जेव्हा तुमच्याकडे मतं मागायला येतील तेव्हा त्यांना याबद्दल नक्की जाब विचारावा असे बजावले. लाडक्या बहिणी आमच्यासोबत राहिल्या तर या योजनेची रक्कम नक्की वाढवू असेही यावेळी सांगितले. तसेच महायुतीचे उमेदवार मंगेश कुडाळकर यांना ५० हजारांहून अधिक मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन यासमयी स्थानिक नागरिकांना केले.
यावेळी महायुतीचे उमेदवार मंगेश कुडाळकर, शिवसेना उपनेत्या सौ.कला शिंदे, शिवसेना विभागप्रमुख अल्ताफ पेवेकर तसेच शिवसेना,भाजप, राष्ट्रवादी आणि आरपीआय महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व कुर्ला विधानसभा मतदार क्षेत्रातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते..
Discussion about this post