बाबूराव बोरोळे
जिल्हा प्रतिनिधी लातूर
दिवाळीचा सण तोंडावर आला असल्याने दिवाळीसणासाठी सासरवाशी महिलांना माहेरी जाण्याची ओढ लागली असून महिलांची लगबग सुरू झाली आहे माहेरी जाण्यासाठी येण्यासाठी काही मार्गांवर एसटी बसेस धावत नसल्याने प्रवाशी वर्गासह माहेरी जाणाऱ्या महिलाची बसेस अभावामुळे त्रेधा उडाली आहे एसटी महामंडळाने एसटी बसेस वाढवावेत माहेरी सासरी ये जा करणाऱ्या महिलानी मागणी केली आहे
गेल्या 35 वर्षापासून सुरु असलेली उदगीर डेपोची उदगीर सुमठाना येरोळ शिरूर अनंतपाळ मार्ग निलंगा जाणारी महामंडळाची एकमेव एस टि बस बंद केल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांची त्रेधा उडाली आहे.
परीवहन महामंडळाच्या अधिका-यांच्या हलगर्जीपणामुळे तालुक्यातील डिगोळ सुमठाना येरोळ येरोळमोड साकोळ या मार्गावरून जाणाऱ्या येणाऱ्या एस टि बसेस सुरू करावी बंद झालेल्या बसेस आता तरी सुरु करावेत अशी मागणी होत आहे.
हात दाखवा बस गाडी थांबवा ब्रीद वाक्याला हरताळ फासत उदगीर व शिरुर अनंतपाळ आगार प्रमुख बससेवा सुरू करत नसल्यामुळे परीसरातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर पाणी फिरत असुन उदगीर व शिरूर अनंतपाळ येथे तालुका ठिकाणावर विविध कामासाठी येण्यासाठी जनतेचे हाल होत असुन अवैध प्रवाशी वाहतुकीवर अवलंबून राहावे लागत आहे. या मार्गावरून बससेवा सुरू करण्याची मागणी जनतेतून होत आहे.
राज्यात परीवहन महामंडळाकडून प्रवाशी वाढविण्यासाठी बसमध्ये प्रवाशांचे स्वागत, वायफाय सुविधा देत प्रवाशांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच शिरूर अनंतपाळ तालुक्यातील डिगोळ सुमठाना येरोळ मार्गावरील व अनेक गावात मात्र बससेवा सुरू नसल्यामुळे विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे हाल होत आहेत.
उदगीर येरोळमोड येरोळ साकोळ जवळगा वलांडी शिरूर अनंतपाळ रस्ता चांगला असुनही अनेक वर्षांपासून बस बंद आहे. येरोळमोड येथून वलांडी शिरूर अनंतपाळ येथे जाण्यासाठी बस उपलब्ध नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना व विशेषतः विद्यार्थ्यीनींना शिक्षण अर्धवट सोडण्याची पाळी आली आहे तर नागरीकाचे हाल होत आहे. उदगीर आगाराप्रमुखानी या मार्गावरून परीवहन महामंडळाची हात दाखवा गाडी थांबवा एसटी बस सुरू करावी.
उदगीर येरोळमोड चाकूर सुरू केल्यास चाकूर तालुक्यातील कबनसांगवी,आंबेबाडी,उजळंब,कुंभेवाडी,नागेशवाडी,मांडूरकी,तिर्थवाडी येथील विद्यार्थी व नागरीकाची सोय होणार आहे .
या मार्गावरून चाकूर व उदगीर येण्यासाठी व जाण्यासाठी महामंडळाची एकही बस सुरू नसल्याने उदगीर व अहमदपूर आगाराची बस नियमित सुरू करण्याची मागणी जनतेतून होत आहे.
उदगीर येरोळमोड ते येरोळ पांढरवाडीमोड साकोळ जवळगा वलांडी शिरूर अनंतपाळ या मार्गावर सकाळी एकच बस धावत होती तिही बंद करण्यात आली आहे. या मार्गावरून एकही बस धावत नाही.
तालुक्याला बस फेऱ्या कमी प्रमाणात असल्याने प्रवाशांना व्यापाऱ्याना नौकर वर्गाना बस गाडीची वाट पहात बसावे लागते. नाहीतर अवैध प्रवाशी वहातुक करावी लागते.
गेल्या दहा वर्षापासून उदगीर निलंगा येरोळमोड पांढरवाडीमोड साकोळ जवळगा वलांडी ही बस दहा वर्षापूवी सुरु होती परंतु या मार्गावर एकही एस.टी.बस येरोळमोड हून धावत नसल्याने प्रवाशांना व शालेय विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागत आहे. उदगीर येरोळमोड शिरूर अनंतपाळ व उदगीर येरोळमोड साकोळ जवळगा वलांडी तसेच उदगीर सुमठाना निलंगा बंद असलेल्या एस.टी.बसेस दिवाळी सणात तर सुरू कराव्यात अशी मागणी सासर वासी महिलानी केली आहे.
Discussion about this post