
गिरवी लक्ष्मी पुत्र (अनिलकुमार कदम प्रतिनिधी) :
सातारा जिल्ह्यातील फलटण,माण ,कराड,खटाव ,खंडाळा, कोरेगांव या तालुक्यात सध्या गहु हरभरा ज्वारी काढणी खुडणी मळणी यांची सुगीची कामं करण्यासाठी शेतकरी शेतमजूर यांची लगबग जोरात सुरु आहे.
सुगीच्या कामानंतर गहु हरभरा ज्वारी धान्याची खरेदी विक्री शेतकरी ते ग्राहक अशी थेट सुरु झाली आहे.त्यामुळे ग्राहकांना स्वस्त आणि मस्त धान्याची खरेदी करण्यासाठी मोठी संधी निर्माण झाली आहे.
शेतकरी आणि ग्राहक यांच्यात सुसंवाद साधून गहु हरभरा ज्वारी या धनधान्यची खरेदी विक्री शेतकरी यांच्या बांधावर रोखठोक होत असल्याने शेतकरी व ग्राहक यांच्यात समाधानाचे वातावरण आहे.शेतकरी व ग्राहक यांची अडत, हमाली, तोलाई, वाहतूक, वेळ आणि पैसा याची बचत होत असल्यामुळे तसेच गहु हरभरा ज्वारी धान्याची खात्रीशीर खरेदी विक्री समोरासमोर होत असल्यामुळें शेतकरी व ग्राहक यांनी आनंद व्यक्त केला आहे.
सातारा जिल्ह्यातील शेतकरी व ग्राहक यांच्यातील या खरेदी विक्रीच्या अभिनव पॅटर्न मुळे फलटण तालुक्यात कृषी क्षेत्रातील नवा प्रयोग यशस्वी होईल अशी अपेक्षा शेतकरी व ग्राहक संघटना प्रतिनिधी मानसिंग धुमाळ यांनी व्यक्त केली आहे..
शेतकरी व ग्राहक संघटना प्रतिनिधी मानसिंग धुमाळ गिरवी येथील प्रयोगशील शेतकरी अनिलकुमार कदम यांच्या गहु पिकाची धान्याची पोती यांचे पुजन करुन ग्राहकांना विक्री करताना,
(छायाचित्र – सौ कल्पना अनिल कदम.)
Discussion about this post