
*देवदेवतांच्या कौल सुरुवातीपासूनच पाठीशी! श्रीदेव पाटेश्वर आणि श्री देव उपरलकर यांचे दर्शन घेत जनतेच्या हक्कासाठी अपक्ष उमेदवार म्हणून विशाल परब रणमैदानात!!*भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या बंडखोरीनंतरही त्यांच्या पाठीशी असणारे कार्यकर्त्यांचे मोहोळ तसूभरही मागे हटलेले नाही. माझा लढा तुमच्या अस्तित्वासाठी आणि मानसन्मानासाठी, उपेक्षित मतदारसंघाच्या विकासासाठी अशी घोषणा करत आज अपक्ष उमेदवार विशाल परब यांनी कार्यकर्त्यांच्या प्रचंड संख्येसह श्री देव पाटेश्वर आणि श्री देव उपरलकर यांचे दर्शन घेत प्रचाराचा नारळ फोडला. जेव्हा आपला हेतू स्वच्छ आणि प्रामाणिक असतो तेव्हा जनतेची मिळणारी साथही प्रामाणिक असते असे म्हणत विशाल परब यांनी आपल्या प्रेमाखातर लोटलेल्या अफाट जनसागराला हात जोडून अभिवादन केले आणि सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले. अपक्ष उमेदवार श्री विशाल परब यांच्या झंजावाती दौऱ्याला सुरुवात झाल्याचे दिसत असून जनतेतून मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हवा आज त्यांच्या बाजूनेच चालली असल्याचे दिसून येते.
Discussion about this post