18 Total Views , 1 views today
*श्रीक्षेत्र माहूर (प्रतिनिधी)- प्रेमदास राठोड* *(8308410247)*
किनवट विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आ. भिमराव केराम यांच्या प्रचारार्थ दि.७ नोव्हें. रोजी किनवट येथे भाजपनेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशाल सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या विशाल सभेला माहुर तालुक्यातील मतदारांसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपचे युवानेते ॲड. रमण जायभाये यांनी केले आहे
सोमवार हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटचा दिवस होता, त्यानंतर प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपनेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजप, शिवसेना (शिंदे गट) व रा.काँ. (अजित पवार गट) या महायुतीचे उमेदवार आ. भिमराव केराम यांच्या प्रचारार्थ दि. ७ नोव्हें. रोजी स.१० वा. किनवट येथील हुतात्मा शंकरशहा गोंडराजे मैदानावर विशाल सभा घेणार आहेत. या सभेला माहुर तालुक्यातील मतदारांसह महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, सर्व आघाडी, सर्वसेल, शक्तीकेंद्र व बूथ प्रमुख यांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहावे, अशी विनंती भाजपचे युवानेते ॲड. रमण जायभाये यांनी केली आहे.
Discussion about this post