आळंदी | खेड- आळंदी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवारी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बाबाजी काळे यांना मिळाली दरम्यान महाविकास आघाडीतील सर्व इच्छुक उमेदवारांनी आपले अपक्ष अर्ज माघारी घेतल्यानंतर महाविकास आघाडीबरोबरच राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आज सकाळी आळंदी येथे जाऊन ज्ञानेश्वर महाराजांचे दर्शन घेऊन प्रचार दौऱ्याला प्रारंभ केला. यावेळी महाविकास आघाडीतील सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते..
Discussion about this post