महायुतीचे उमेदवार दिलीप मोहिते पाटील यांनी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बाबाजी काळे यांच्यावर टीका केली ते म्हणाले की समोरचा उमेदवार ताकदीचा नाही त्यावर प्रतिउत्तर देताना बाबाजी काळे यांनी मोहिते यांची चांगलीच खरडपट्टी घेतली आहे.
यावेळी बाबाजी काळे बोलताना म्हणाले की, तुम्ही आणि तुमची पत्नी दहा वर्षे जिल्हा परिषद सदस्य असताना तुम्ही कुठलही काढीचे काम केले नाही. याउलट मी गेल्या पाच वर्षात जिल्हा परिषद सदस्य म्हणून तुमच्यापेक्षा हजार पटीने तालुक्यात काम करू शकलो. मला जी पदे मिळाली ती पदे मी समाजाच्या हितासाठी वापरली. तुम्हाला आमदारकी दिली तुम्ही एमआयडीसीतला मलिदा खाऊन तालुक्याच्या टाळूवरचं लोणी खाल्लं आणि मोठेमोठे बंगले आणि गाड्या घेतल्या. पहिल्या निवडणुकिला तुमचे सगळे पैसे संपले होते आता आले कुठून ? असा सवाल बाबाजी काळे यांनी उपस्थित केला.
तालुक्यातील ९०% जनतेने ठरवलं आहे की यावेळी परिवर्तन करायचं. ही ९०% जनशक्ती माझ्यामागे आहे. पैशाच्या जीवावर तुम्ही म्हणता माझ्या समोरचा उमेदवार ताकदीचा नाही. मान्य आहे मी तुमच्यापेक्षा अधिक पैशाने ताकदीचा नाही तुमच्याकडे अनैतिक मार्गाने कमवलेले पैसे आहेत, परंतु माझ्याकडे हा जनसमुदाय आहे तुम्हाला हा जनसमुदायच दाखवून देईल की तुम्ही किती ताकतीचे आहात आणि मी किती ताकतीचा आहे.
अशा प्रकारे बाबाजी काळे यांनी दिलीप मोहिते यांचा समाचार घेतला..
Discussion about this post