हिंगणघाट–
नगरपरिषद हिंगणघाट द्वारा संचालित पीएमश्री लोकमान्य टिळक प्राथमिक शाळेत एक आगळी वेगळी निवडणूक पार पडली. विध्यार्थ्यांना शालेय जीवनातच लोकशाहीत होणाऱ्या निवडणुकांची माहिती व्हावी यासाठी शालेय मंत्रीमंडळ निवडणूक आणि खातेवाटप करण्यात आले. ही निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने मतपत्रिकेद्वारे घेण्यात आली.
सर्व शिक्षकांनी आपापल्या वर्गामध्ये विद्यार्थ्याना मतदानाबाबत माहिती दिली. प्रत्येक शैक्षणिक वर्षामध्ये शालेय अभ्यासक्रमाबरोबर सहशालेय उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने शाळांमध्ये शालेय मंत्रीमंडळाची निर्मिती केली जाते.त्याचाच भाग म्हणून शाळेत मंत्रीमंडळासाठी दहा विद्यार्थी उमेदवारांची निवडणूक झाली, त्यात सर्वाधिक मते मिळविणारी सायली दिपक चौधरी ही मुख्यमंत्री म्हणून निवडून आली.
क्रीडामंत्री यश पुनवटकर, स्वच्छतामंत्री अनफ जावीद शेख, सांस्कृतिकमंत्री आस्था राठोर, शिक्षणमंत्री भूमिका मुळे,सहाय्यक मंत्री म्हणून शिवण्या गावंडे, आफरियाअनम, बुशरा वहीदखान पठाण, अर्शीया शेख,देवांश हिवरे यांची निवड झाली.मंत्रीमंडळ निवड प्रक्रियेमध्ये शाळेचे मुख्याध्यापक गिरीधर कोठेकर हे अध्यक्षस्थानी होते.यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा वैशाली दिपक चौधरी, समिती सदस्या प्रियंका प्रशांत गावंडे व वैशालीताई भडे प्रामुख्याने उपस्थित होत्या.
शाळेतील जेष्ठ शिक्षक शेषराव म्हैस्के यांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. यावेळी शिक्षिका कविता चव्हाण व मिना आडकिने यांनी परिश्रम घेतले. शाळेतील शिक्षक चंद्रशेखर कोठेकर यांनी सर्वांचे आभार मानले. शाळेत विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांनी शाळेचे कौतुक केले.नवनियुक्त शालेय मंत्रिमंडळाला नगरपरिषद शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी प्रविण काळे यांनी शुभेच्छा दिल्या.


Discussion about this post