सप्ताहाचा आरंभ
तरने को लीनता डुबने को अभिमान। पंचाळे पंचक्रोशी सिन्नर तालुका व शाहापंचाळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘श्री संत सदगुरु योगीराज गंगागिरीजी महाराज यांचा १७७वा अखंड हरिनाम सप्ताह’ दिनांक १० ऑगस्ट २०२४ ते १७ ऑगस्ट २०२४ पर्यंत भव्य महोत्सवाने साजरा करण्यात येणार आहे.
दैनिक कार्यक्रम
सप्ताह कालावधी दरम्यान विविध धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. दररोज सकाळी ९ ते ११ वाजता किर्तनाची सत्रे सुरू होतील. दुपारी १:०० वाजता प्रवचन व २ ते ४ वाजता किर्तन असेल. मंहत गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांचे प्रवचन दुपारी १.०० ते २ः०० वाजता होईल.
विशेष कार्यक्रम
शुक्रवार, १६ ऑगस्ट २०२४, एकादशी निमित्त दुपारी २ ते ४ वाजता विशेष किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, १७ ऑगस्ट २०२४, सकाळी १०.०० वाजता हजारो भाविकांच्या उपस्थितीत भव्य काल्याचे हरिकीर्तन होईल. महाप्रसाद वितरणाने सप्ताहाचा समारोप होईल.
आपले निमंत्रण
पंचाळे पंचक्रोशी व सिन्नर तालुक्यातील सर्व भाविकांना या महोत्सवातील कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आव्हान करण्यात आले आहे. श्री सदगुरु गंगागिरीजी महाराजांच्या पवित्र स्मरणार्थ आयोजित या हरीनाम सप्ताहात आपली उपस्थिती महोत्सवाला अधिक मंगलमय करेल.
Discussion about this post