शहापूर:- जालना वडिगोद्री राष्ट्रीय महामार्ग ७५३ वरती मोटार सायकल चा अपघात होऊन एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना अंबड तालुक्यातील शहापुर येथे ओम शांती विद्यालया जवळ गुरूवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास घडली आहे.यात एक ३२ वर्षीय तरूण गंभीर जखमी झाला आहे.
अंबड कडुन शहागड कडे मोटारसायकल क्र.एम एच २१ बी के ५८७२ जात असताना शहापूर शीवारात ओम शांती विद्यालय जवळ मोटार सायकल चा अपघात झाला यात प्रशांत मनोहर पटेकर वय ३२ वर्ष रा.बळेगाव ता.अंबड हा तरूण गंभीर जखमी झाला आहे.
अपघाताची माहीती मिळताच शहापूर व धाकलगाव येथील तरूणांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला तात्काळ अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते परंतु सदर तरूणांची प्रकृती गंभीर असल्याने नातेवाईकांनी जालना येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले असुन त्यांच्यावर उपचार सुरु असुन सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.सदर अपघात कश्यामुळे झाला हे अद्याप समजू शकले नाही.
Discussion about this post