

कैलासराजे घरत..
खारपाडा पेण..
युथ महाराष्ट्रच्या संपादिका दिपाली पारसकर यांच्या संकल्पनेतून त्यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल येथील जीवन ज्योत वृद्धाश्रम येथे बुधवार दिनांक ६ नोव्हेंबर २०२४ रोजी अन्नदान व फळ वाटप करण्यात आले. तसेच वृद्धाश्रमामधील निवासीं सोबत केक कापून संगीतमय वातावरणात वाढदिवस साजरा करण्यात आला.
अग्रगण्य पध्दतीने समाजाचे समाजासमोर प्रतिबिंब मांडण्याचे काम दिपाली ताई पारसकर करत आहेत. आणि आम्हा सर्व पत्रकारांच्या दृष्टीने ही अभिमानाची गोष्ट आहे असे मत पत्रकार दीपक घोसाळकर यांनी व्यक्त केले. यावेळी पत्रकार सनिप कलोते म्हणाले की आपण देखील वृध्दाश्रम मध्ये वाढदिवस साजरा केला पाहिजे त्यामुळे येथील निर्वासितांना आनंद मिळतो.
दिपाली पारसकर समाजसेवा आणि पत्रकारीतेमध्ये सर्वगुणसंपन्न आहेत असे मत समाजसेवक यशवंत बिडये यांनी व्यक्त केले.
यावेळी पनवेल नगरपालिकेचे माजी नगरसेवक अजय भोईर, पत्रकार रत्नाकर पाटील, पत्रकार सुधीर पाटील, पत्रकार सुभाष वाघपंजे, पत्रकार दीपक घोसाळकर, पत्रकार सनिप कलोते, पत्रकार सुनील वारगडा, खुशी एंटरप्राजेसचे संचालक अजय दुबे, समाजसेवक यशवंत बिडये, यशकल्प फाउंडेशनच्या अध्यक्षा यशश्री बिडये, जीवनज्योत वृध्दाश्रमचे संचालक श्रीदेवी भुसणे, राजू चौधरी तसेच आश्रमातील निवासी आदी मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमामुळे आश्रमातील सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित झाला होता.
सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्र भूषण पत्रकार कैलासराजे निर्मला कमलाकर घरत यांनी युथ महाराष्ट्रच्या संपादिका पत्रकार दिपाली पारसकर यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले आणि अशाच प्रकारचे उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपणे ही काळाची गरज आहे असे मत व्यक्त केले..
Discussion about this post