
पालघर – सौरभ कामडी..
मोखाडा. ता. – विक्रमगड विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंग चढला आहे. गाव खेड्यापाड्यात वाहनांवर ध्वनिक्षेपकावरुन प्रचाराची राळ ऊडवली जात आहे. गाव बैठका घेतल्या जात आहेत. त्यातच मोखाडा तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या खोडाळा गावात शनिवारी आठवडे बाजाराची संधी साधून सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला धुराळा ऊडवला आहे. त्यामध्ये महाविकास आघाडी चे ऊमेदवार सुनिल भुसारांची रॅली लक्षवेधी ठरली आहे.
पालघर जिल्ह्यातील भौगोलिक दृष्ट्या विस्तीर्ण पसरलेल्या विक्रमगड विधानसभा क्षेत्रात, ऊमेदवारांना मतदारांपर्यत पोहोचण्याचे मोठे आव्हान आहे. सध्यस्धितीत खरीपाच्या कापणीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे गाव, खेड्यापाड्यातील मतदार शेतीच्या कामांत गुंतला आहे. ऊमेदवार आणि कार्यकर्ते प्रचारासाठी गावपाड्यांत जातात मात्र, सर्वच मतदारांची
भेट होत नाही. त्यामुळे त्यांना विन्मुख होऊन माघारी पररतावे लागते आहे.
गावपाड्यांतील नागरीक दररोज बाजारहाट करण्यासाठी येत नाही. ते आठवडा बाजाराच्या दिवशी जीवनावश्यक वस्तु खरेदी साठी येतात. मोखाडा तालुक्यात खोडाळा आणि मोखाडा या दोनy मुख्य बाजारपेठा आहेत. त्यामध्ये खोडाळ्याचा आठवडे बाजार शनिवारी भरतो. याच दिवशी पंचक्रोशीतील सुमारे 40 ते 50 गावपाड्यांतील नागरीक बाजारहाट करण्यासाठी येतात.
आठवडे बाजाराची हीच नामी संधी साधून खोडाळा आठवडे बाजारात महाविकास आघाडी चे ऊमेदवार सुनिल भुसारांनी रॅली काढुन, मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी वाहनावर ध्वनिक्षेपक लावुन प्रचाराचा धुराळा ऊडवला आहे. लाल बावटाच्या कार्यकर्त्यांनी चौकात ऊभे राहुन ध्वनिक्षेपकावरुन प्रचार केला आहे. मात्र, आठवडे बाजारात महाविकास आघाडी चे ऊमेदवार सुनिल भुसारांची रॅली लक्षवेधी ठरली आहे..
Discussion about this post