


लातूर:-मिशन मावळा ह्या नवोदित मित्र संघटनेकडून संत गाडगेबाबा अनाथ मतिमंद मुलांचे बाळग्रह आईचे घर येथील मुलांना थंडी पासून संरक्षणार्थ 110 ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.
सोबत शिक्षण घेऊन बऱ्यापैकी नैकरी हुद्यावर गेलेल्या तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा सामाजिक कार्याचा वारसा पुढे न्हेत एकत्र येऊन आपण ज्या समाजातून आलो त्या समाजाचे काही देणे लागतो, ह्या हेतूने समाजातील रंजले-गांजले,उपेक्षित वर्ग यांना
छोटासा मदतीचा हात देऊन समाजकार्यात उडी घेतली.
त्यामध्ये सचिन सूर्यवंशी, सुधाकर केंद्रे,महेश पवार,शंकर पवार,पवन मोरे व विशाल लोंढे ह्या मित्रांनी एकत्र येऊन अनाथाच्या,दिव्यांगाच्या मदतीसाठी उतरले.त्यांनी एकूण 110 मुलांना थंडीपासून बचावासाठी ब्लॅंकेट वाटप केले.व अनाथ अपंग मुलांच्या जीवनात मायेची ऊब देण्याचे काम ह्या तरुणांनी केले.ह्या त्यांच्या कामाचे कौतुक सर्वच स्तरातून होत असून त्यांनी समाजातील अन्य लोकांना पुढे येऊन मदत करण्याचे आव्हान केले आहे..
Discussion about this post