लेकाच्या स्वप्नासाठी बाप सह्याद्री सारखा उभा…
पाथरी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना प्रत्येक जण आपापल्यापरीने प्रचाराच्या युव्रचना आखून प्रचार करत आहेत. काहींकडे पक्षाचे सिम्बॉल तर काहींकडे घराणेशाहीचा वारसा तर काहीजन समाजाच्या जोरावर प्रचारात करत आहेत.
अशातच एक नाव समोर येते ते म्हणजे माजी आमदार मोहन भाऊ फड 2019 च्या प्रभावानंतर कुटुंबावरती नियतीने अनेक आघात आणून सुद्धा समाजसेवेची कास कधी न सोडणारा हा आरोग्य दूत म्हणून ओळखला जातो.
इंद्रायणी मित्र मंडळाच्या माध्यमातून असंख्य जनतेच्या आरोग्याची काळजी घेत अनेकांचे ऑपरेशन करून जीवनदान देण्याचे कार्य माजी आमदार मोहन भाऊ फड यांनी केले.
सातत्याने मनामध्ये समाजसेवेची ओढ असल्याकारणाने कुटुंबावर आलेल्या संकटाला नाजुमानत लोकांची सेवा सातत्याने करत राहिले.
नियतीच्या मनात काय चालू आहे कळण्यास मार्ग नाही. आज भाऊ आजारपणात असून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत परंतु समाजसेवेची सल मनामध्ये कुठेतरी सलत आहे.
भाऊ नेहमी म्हणायचे मला स्वतःला मतदारसंघांमधील प्रत्येक शेतकऱ्याच्या प्रत्येक सामान्य माणसाच्या, कष्टकरी ,मजुरांच्या, माता माऊलींच्या चेहऱ्यावर समाधान मला बघायचं आहे. जोपर्यंत मला मतदारसंघातील युवकांच्या हाताला काम मिळत नाही तोपर्यंत मला शेवटच्या श्वासापर्यंत जनतेच्या हितासाठी काम करायचे आहे. गोरगरिबांच्या चेहऱ्यावरच्या हसू येण्यासाठी काम करायचे आहे. परंतु नियतीने भाऊंना आजारपणाने घेरले.
परंतु निधड्या छातीचा बाप माणूस आदरणीय माधवराव फड साहेब यांनी लेकाकडे पाहून त्याच्या मनातील वेदना लक्षात घेऊन. त्याच्या स्वप्नाकडे पाहून.स्वतः मुलाच्या स्वप्नासाठी सह्याद्री सारखा बापमाणूस मतदारसंघांमध्ये उमेदवारी करत फिरत आहे.
खरं तर ही लढाई
“एका विशिष्ट जातीसाठी नाही”
“एका विशिष्ट धर्मासाठी नाही.
ही लढाई सर्वसामान्य आणि एका दूरदृष्टी असलेल्या नेत्याच्या स्वप्नासाठी आहे.
आज आदरणीय साहेबाकडे पाहून गावागावांमध्ये आल्यानंतर प्रत्येक समाज हा त्यांच्याकडे एक आशेने पाहत आहे आपल्या मुलाचे भवितव्य ह्याच व्यक्तीच्या हातात आहे.अशी प्रत्येकाला जाणीव होत आहे. त्यामुळे मायबाप जनता नक्कीच येणाऱ्या दिवसात साहेबांच्या अंगावरती विजयाचा गुलाल टाकून स्वतःचे कुटुंब उज्वल भविष्याकडे वाटचाल करून प्रत्येक सुजन नागरिक भरभरून आशीर्वाद देतील यात काही शंका नाही.
विठ्ठल सावंत(उखळी बुद्रुक) ७७७६८९५००२
Discussion about this post