सोयगाव
महायुतीचे उमेदवार अब्दुल सत्तार यांचे कार्यकर्ते ज्या वाहनातून सोयगावकडे येत होते. त्या वाहनात पैसे असल्याच्या संशयावरून शिवसेनेच्या (उबाठा) कार्यकर्त्यांनी मंगळवारी संत गाडगेबाबा चौकात वाहन थांबविल्याने एकच गोंधळ उडाला होता.
महायुतीचे व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता.
आचारसंहिता पथक व पोलीस प्रशासन हे नावालाच :
आचारसंहिता पथक प्रमुख दादाराव आहेर व सपोनि पंकज बारवाल यांनी वाहनाची चौकशी न करताच सोडून दिल्याने शहरात तणाव निर्माण झाला होता. दोन्ही अधिकाऱ्यांवर कामात कसूर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
मंगळवारी एम एच २० जि क्यु ८००६ या गाडी मध्ये सत्तारांचे कार्यकर्ते प्रवास करीत होते. मतदारांना वाटण्यासाठी गाडीत पैसे असून ही गाडी सोयगावच्या दिशेने येत असल्याची माहिती मिळाल्याने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी संत गाडगेबाबा चौकात गाडी अडवली होती.. ही वार्ता वाऱ्यासारखी पसरल्याने संत गाडगेबाबा चौकात शेकडो कार्यकर्त्यांचा जमाव एकत्र झाला होता. दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने आल्याने चौकात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता.
झोपेत व दबावात असलेले आचारसंहिता पथक प्रमुख दादाराव आहेर, व सोयगाव पोलीस ठाण्याचे सपोनि पंकज बारवाल हे नेहमी प्रमाणे बघायची भूमिका घेत घटनास्थळी दाखल झाले होते. सदरील गाडीत अब्दुल सत्ताराचा नातेवाईक असलेला शेख जावेद उर्फ बबलु व त्याचे कार्यकर्ते बसले असल्याने आचारसंहिता पथक प्रमुख दादाराव आहेर व सपोनि पंकज बारवाल यांची, त्यांना गाडीतून उतरावे वाहन तपासणी करायची आहे असे सांगण्याची हिम्मत झाली नाही.
राज्य निवडणूक आयोगाच्या नियमानुसार संबंधित गाडीची चौकशी न करता सदरील गाडी दोघा अधिकाऱ्यांनी तपासणी विना सोडून दिली. तर सत्तारांची इतकी दहशत आहे. आचारसंहिता पथकात असलेल्या कर्मचाऱ्यांनी जणू प्रेक्षकांसारखी बघायची भूमिका घेतली होती. दोघा अधिकाऱ्यांना सत्तारांच्या कार्यशैलीचा चांगला अनुभव असल्याने निवडणुकीची पारदर्शकता वेशीला टांगली आहे.
निवडणूक दरम्यान गटविकास अधिकारी, तहसीलदार व पोलीस ठाणे प्रमुखाची बदली न झाल्याने निवडणुकीच्या पारदर्शकतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून आचारसंहिता पथक प्रमुख दादाराव आहेर व सपोनि पंकज बारवाल यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी राज्य निवडणूक आयोग व जिल्हा निवडणूक विभाग काय कार्यवाही करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Discussion about this post