मंगळवार, दि, १२/११/२०२४
अंकलखोप ता. पलूस, जि. सांगली
सशक्त लोकशाही निर्माण करण्यासाठी नागरिकांना सशक्त बनविण्यासाठी आणि लोकांच्या इच्छेला प्रतिबिंबित करणारे सरकार सुनिश्चित करण्यासाठी मतदान जागृती महत्वपूर्ण आहे. अधिकार असण्यापलिकडे हे एक नागरी कर्तव्य आहे, जे लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग सक्षम करते
हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जिजामाता बालक मंदिर ने आज मतदार जनजागृती करिता अंकलखोप मधील झेंडा चौक येथे भव्य मतदार जनजागृती रांगोळी साकारली.
या कार्यक्रमासाठी मा. श्री आबासाहेब डोंबाळे (साहेब) केंद्र प्रमुख, केंद्र अंकलखोप, संस्थेचे सचिव मा.ए के चौगुले साहेब, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ, अरूणा सूर्यवंशी मॅडम, सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
झेंडा चौक मध्ये केंद्र प्रमुख मा. डोंबाळे साहेब ,सर्व शिक्षक, मुख्याध्यापिका, विद्यार्थी,उपस्थित ग्रामस्थ, अंगणवाडी सेविका यांची मानवी साखळी तयार करून मतदार जनजागृती करिता आव्हान करण्यात आले
Discussion about this post