श्रीक्षेत्र माहूर (प्रतिनिधी)- प्रेमदास राठोड* (8308410247) राज्य उत्पादन शुल्क हरच्या वतीने विभाग किनवट / माहूरच्या १५ ऑक्टों. ते आज पर्यंत ४९ ठिकाणी अवैध दारू अड्यांवर धाडी टाकून ४६ आरोपींना ताब्यात घेऊन त्यांचेवर गुन्हे दाखल केले आहेत. या धाडसत्रात ६ वाहनांसह देशी, हातभट्टी व विदेशी दारू, ताडी आणि सडवा असा एकूण ७,७१,००५रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागा कडून किनवट / माहूर या मतदारसंघांत होणाऱ्या अवैध दारू विक्रीवर बारीक नजर ठेवली आहे.
सदरची कारवाई अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क नांदेड विभागाचे गणेश पाटिल यांच्या मार्गदर्शनात किनवटच्या निरीक्षक रत्नमाला गायकवाड, दुय्यम निरीक्षक रामप्रसाद पवार, बलीराम ईथ्थर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. त्यांना सहाय्यक दुय्यम निरीक्षक मोहम्मद रफी अब्दुल, जवान एम., यू. अनकाडे, अरविंद जाधव, निशिकांत भोकरे, किरण खंदारे व वाहनचालक दिलिप जाधव यांचे सहकार्य लाभले.
आचारसंहिता कालावधीत अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक, विक्री करण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहे. तसेच कुठेही अवैध दारूविक्री होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. अशी माहिती निरीक्षक रत्नमाला गायकवाड यांनी दिली.
Discussion about this post