*श्री क्षेत्र परशुरामाच्या डोंगरमाथ्यावरील भव्य पणती चे त्रिपुरीपौर्णिमेला प्रज्वलन**चिपळूण*-प्रति पंढरपूर म्हणून ख्याती असलेल्या श्री क्षेत्र भार्गवराम ( परशुराम ) ची परशुराम डोंगरमाथ्यावर , सवतसडयाच्या वरील टेकडीवर असणारी पुरातन भव्य पणती प्रज्वलन कार्यक्रम त्रिपुरारी पौर्णिमा , शुक्रवार दि .१५ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ४ वाजता श्री जुना काळभैरव मंदिरात श्रीफळ वाढवून प्रारंभ होईल. भक्तगण याना या मोहिमेसाठी नेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्यां भक्तगण याना या मोहिमेत सहभागी व्हायचं असेल त्यांनी शुक्रवार दि. १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता श्री ग्रामदैवत जुना कालभैरव मंदिरात उपस्थित राहावे. परशुराम मंदिरात जाण्यासाठी गाडीची व्यवस्था करण्यात आली आहे. सायंकाळी ५ वाजता श्री देव भार्गवराम परशुराम देवस्थानातून म्हशाल पेटवून बजरंग मित्र मंडळ व भक्तगण पायरवाडी कडून दीपमाळ टेकडीवर पर्यन्त पोहचतील. ही भव्य दीपमाळ जांभा दगडात कोरलेली आहें. या पणतीचा प्रकाश चिपळूणकरना पाहतां येतो.श्री क्षेत्र परशुराम दीपमाळ ही शिवकालीन आहे. महेंद्रगिरि पर्वतावरील एका ऊंच शिखर माथ्यावर ही दीपमाळ आहे.
दीपमाळेच्या बांधकामात जांभा दगडाचा वापर केलेला आहे. महेंद्र गिरिच्या सर्वोच्य माथ्यावर असलेल्या या दीपमाळ शिखर बिन्दुवरून चिपळूण शहर, श्री परशुराम मंदिर व गाव, सह्याद्रि पर्वताच्या मुख्य आणि उपरांगा अश्या परिसराचे दर्शन होते. त्याचप्रमाणे चिपळूण शहरातून या दीपमाळेचे दर्शन होते. दीपमाळे कडे जाण्यासाठी परशुराम गावच्या पायरवाडीतून पाऊलवाट आहे. ही वाट जंगलमय, गवताळ कुरणे,डोंगराळ भाग यातून जाते.अनेक नागरिक, ग्रामस्थ,तरुण,उपस्थित असतात.प्रति पंढरपूर म्हणून ख्याती असलेल्या श्री क्षेत्र भार्गवराम ( परशुराम ) ची परशुराम डोंगरमाथ्यावर , सवतसडयाच्या वरील टेकडीवर असणारी ही पुरातन भव्य पणती काळ्या दगडात कोरलेली असून त्यामधे १ डबा ( १५ किलो ) गोडेतेल व १ पंच्या चे म्हणजे धोतर पान वातीसाठी वापरले जात असे .या पणती प्रज्वलनाचे २१ वे वर्ष असून चिपळूण शहरातील व परिसरातील भक्तगणांच्या सहकार्याने कार्यकर्ते यांनी या भव्य पणती ची भग्नअवस्था घालवून २१ वर्षांपूर्वी खंडित झालेले दीपप्रज्वलन पुनश्च सुरू केले .
पूर्वी ग्रामदैवत जुना काळभैरव देवस्थानं तर्फे या त्रिपुरारी पौर्णिमेच्या श्री क्षेत्र परशुराम पणती च्या प्रज्वलनासाठी १ डबा तेल व वातीसाठी १ पंच्या ( धोतराचे ) पान प्रतिवर्षी देण्याची ऐतिहासिक परम्परा होती . गत २० वर्षांपासून श्री ग्रामदैवत जुना काळभैरव देवस्थानं ट्रस्ट , चिपळूण तर्फे हि परम्परा पुनश्च सुरू करण्यात आली आहे .या पणती चा प्रकाश श्री देव परशुराम मूर्ती च्या अंगावर पडतो .असे जाणकार मंडळी सांगतात .चिपळूण शहर परिसरातून या पणती चा प्रकाश त्रिपुरी पौर्णिमेच्या रात्री सर्वत्र दिसतो .भक्तगण नागरिक हा दीप पाहून भार्गवरामाला नमस्कार करतात .
या पणती च्या प्रज्वलनासाठी परशुरामचे स्थानिक ग्रामस्थ व चिपळूण शहर व परीसरातील भक्तगण कार्यकर्ते यांनी २००१ सालच्या त्रिपुरा पौर्णिमेपासून पासून सुरुवात केली जिथे जाणेच आवघड आहे त्या ठिकाणी भग्न झालेली दीपमाळ वाळू सिमेंट पाणी नेऊन तिची डागडुगी केली व पूर्व रुपात आणली त्यासाठी नितीन लोकरे , अभय शिंदे , राजा राऊत, अमोल जोगळेकर , विजय पाथरे, समीर राऊत,अभी शेट्ये , दिनेश पटवर्धन, संकेत राऊत, अभी राऊत, साहील रानडे, संतोष शिंदे , देवेंद्र गोंधळेकर , प्रवीण गोंधळेकर, सुरेश बहुतले, अभय सहस्त्रबुध्दे, ओंकार गोखले , विनय पिंपुटकर , उत्कर्ष नाखरे , जयदीप जोशी, संतोष मोरे ,राऊत आळी व परशुराम, पेढे , चिपळूण शहर आशा असंख्य कार्यकर्त्यांमुळे हे शक्य झाले मी फक्त निमित्त मात्र आहे. श्री देव परशुराम महाराज यांनी माझ्या कडून हे कार्य करून घेतले. कुणा कार्यकर्त्यांचे नाव राहिले असल्यास शमा असावी असे श्री. नितीन लोकरे यांनी सांगितले. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी श्री.नितीन लोकरे- 8149444044श्री.अभय शिंदे- 7218869037श्री. समीर शेट्ये- 9890159247श्री. शंकर कानडे- 7774021100श्री.जयदीप जोशी- 9028989125यांच्या कडे संपर्क साधावा. तसेच भक्तगण नागरिकांनी या दीप दर्शनाचा लाभ घ्यावा .असे आवाहन करण्यात येत आहे .
Discussion about this post